Mumbai hit and run: महिलेला चिरडलं अन् चालकाला BMW चालवायला दिली, वडिलांनी पळून जाण्यास सांगितलं; पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

Worli BMW hit and run case : शिंदे गटाच्या नेत्याचा मुलगा मिहीर शहा हा आरोपी असून पोलिसांनी यासंदर्भात कोर्टात नवी माहिती दिली आहे. अपघात झाल्यानंतर मिहीर शहाने चालकासोबत सीट बदलली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
MIHIR SHAH
MIHIR SHAH

मुंबई- वरळी येथील हिट अँड रन प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. मुंबईमध्ये रविवारी सकाळी एका महिलेला चिरडण्यात आले होते. याप्रकरणी शिंदे गटाच्या नेत्याचा मुलगा मिहीर शहा हा आरोपी असून पोलिसांनी यासंदर्भात कोर्टात नवी माहिती दिली आहे. अपघात झाल्यानंतर मिहीर शहाने चालकासोबत सीट बदलली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

आरोपी मिहीर शहाने जवळपास दीड किलोमीटरपर्यंत महिलेला फरफटत नेल्याचं सांगण्यात आलं आहे. मिहीर शहाने नंतर आपली BMW चालक राजऋषी बिडवात याला चालवायला दिली. त्याने गाडी रिव्हर्स घेऊन महिलेले बोनेटवरून खाली पाडले. पुरावे नष्ट करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात आले असं पोलिसांनी सांगितलं.

MIHIR SHAH
Hit and Run : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ‘सिरीअस’ माणूस नाही;मुंबईतील ‘हिट अँड रन’वरून नाना पटोले यांची टीका

मिहीर शहा हा फरार आहे, तर त्याचे वडील राजेश शहा आणि चालक राजऋषी बिडवात यांना पोलिसांनी अटक केली होती. बिडवात आणि राजेश शहाला कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. बिडवात याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राजेश शहाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, त्यानंतर त्याला जामीन देखील मिळाला आहे.

अपघातामध्ये कावेरी नखवा ( वय ४५) या महिलेचा मृत्यू झालाय तर तिचा पती प्रदिप नखवा ( वय ५०) हे गंभीर जखमी झाले आहेत. BMW चालक चालवत असल्याचा दावा करण्यात येत आहे, पण, प्रदिप नखवा यांनी कार मिहीर शहा चालवत असल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी देखील म्हटलंय की, मिहीर शहा कार चालवत होता. अपघातानंतर त्याने चालकाला गाडी चालवण्यास दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. अपघातानंतर मिहीर शहाने आपल्या वडिलांना फोन केला. वडिलांनी मिहीरला पळून जाण्याचा सल्ला दिला, तसेच चालक बिडवात याला जबाबदारी घेण्याच्या सूचना दिल्या.

MIHIR SHAH
Pune Hit And Run Case : पोलिसांना उडवलं अन् घरी जाऊन झोपला... पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठा खुलासा

पोलिसांच्या वतीने खटला चालवणाऱ्या वकील भारती भोसले म्हणाल्या की, महिला टायर आणि बम्परमध्ये अडकली होती. तरी, कार दीड किलोमीटरपर्यंत चालवण्यात आली. त्यानंतर महिलेचा मृतदेह गाडी थांबवून काढण्यात आला. त्यानंतर बिडवात चालकाच्या सीटवर बसला. दोन्ही आरोपी त्यानंतर बांद्राकडे निघाले. कलानगर भागामध्ये त्यांनी गाडीच्या नंबर प्लेटसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. मिहीर तेथून पळून गेला अन् बिडवात गाडीजवळच थांबला.

पोलिसांनी सांगितलं की, राजेश शहा त्यानंतर गाडीजवळ आला. गाडीला टो करण्याचा देखील त्यांचा प्रयत्न होता. पण, त्याआधीच आम्ही त्याठिकाणी पोहोचलो आणि दोघांना ताब्यात घेतले. चालकाने कबुल केलंय की, राजेश शहाने त्याला जबाबदारी घेण्याचे निर्देश दिले होते. राजेश शहा आणि बिडवात दोघांनी कारची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com