मेडिकलमध्ये हलगर्जीपणामुळे वृद्ध महिलेचा मृत्यू

अन्ननलिकेतून नकली दात काढताना हयगय
woman
womanSakal

नागपूर - पासष्ठ वर्षांची वृद्ध महिला. पाणी पिताना नकली दात पोटात गिळला. तो अन्ननलिकेत अडकला. दोन दिवसांपूर्वी मेडिकलमध्ये तिला दाखल केले. डॉक्‍टरांनी एंडोस्कोपीतून दात काढण्याची प्रक्रिया केली. मात्र अचानक मेडिकलमध्ये वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रकार केला, मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातावेईकांनी केला आहे. मृत महिलेचे नाव ॲरिक मेरिक वॅंड्रिन असे आहे.

दोन दिवसांपुर्वी मेडिकलमध्ये वॉर्ड क्रमांक ८ मध्ये तिला दाखल केले. नंतर वॉर्ड १६ मध्ये हलवले. इंडोस्कोपीतून नकली दात काढण्यात येईल असे डॉक्टरांनी सांगितले. विशेष असे की, वृद्धा चालत उपचारासाठी आली. इंडोस्कोपी झाल्यानंतरही तिने कुटुंबियांशी संवाद साधला. मात्र काही वेळानंतर वृद्ध महिला बोलू शकत नव्हती.

डॉक्टरांनी अचानक सर्जरी करण्यासाठी ओटी ई मध्ये तिला हलवले. येथून पुढे अतिदक्षता वॉर्डात (वॉर्ड ५१) मध्ये नेले. डॉक्टरांची ही लगबग बघून नातेवाईकांनी थेट डॉक्टरांशी संवाद साधून सत्य सांगावे अशी सूचना केल्यानंतर वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची कबुली दिली. तत्काळ मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

मृत्यू झाल्याचे दडवल्याचा आरोप

नकली दात काढण्यासाठी डॉक्टरांनी उशीर केला. वारंवार विचारणा केल्यानंतरही गंभीर नसल्याचे सांगण्यात आले. नकली दात आज नाहीतर उद्या काढता येईल, असे येथील महिला डॉक्टरने सांगितले, असे खुद्द मृतक महिलेचा भाऊ रॉबर्ट ॲन्थोनी म्हणाले. डॉक्टरांनी उशीर केल्यानेच मृत्यू झाला असल्याचा आरोप करीत मेडिकलमधील डॉक्टरांच्या विरोधात अजनी पोलिसांमध्ये तक्रार करण्यासाठी नातेवाईक रात्री उशिरा पर्यंत थांबले होते.

त्या रुग्णाच्या अन्ननलिकेत मेटल अडकले असल्याची माहिती मिळाली. ते सर्जरी विभागात शस्त्रक्रिया करून काढण्यात येणार होते. एका विभागात नाही झाले, यामुळे सर्जरीत रुग्णाला पाठवले, यासंदर्भात माहिती घेतो.

- डॉ. अतुल राजकोंडावार, वैद्यकीय अधीक्षक मेडिकल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com