esakal | देशात प्रथमच होणार हत्ती गणना
sakal

बोलून बातमी शोधा

Elephant

देशात प्रथमच होणार हत्ती गणना

sakal_logo
By
राजेश रामपूरकर :सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जगभरात हत्तींची शिकार वा रहिवासाची ठिकाणे लुप्त होत असल्याने हत्तींची संख्या लक्षणीयरित्या कमी झालेली आहे. यामुळे धोक्यात असलेल्या हत्ती या प्रजातींची गणना प्रथमच केली जाणार आहे. मात्र, महाराष्ट्रात हत्तीचा अधिवास नसल्याने गणना केली जाणार नसल्याचे समजते. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे हत्ती हे प्रवासी असून ते कर्नाटकातून येतात.

हेही वाचा: मुकुल वासनिक की अविनाश पांडे? राज्यसभेसाठी दोघांची नावे चर्चेत

भारतात सर्वाधिक ६० टक्के हत्ती आहेत. उर्वरित थायलंड, मलेशिया, नेपाळ, म्यानमार, कंबोडिया, भूतान येथे आहेत. यंदा प्रथमच हत्तीच्या विष्ठेवरून ‘डीएनए’ काढून त्याची ओळख निश्चित करून गणना केली जाणार आहे. मात्र, महाराष्ट्रात हत्तीचा अधिवासच नाही. त्यामुळे त्याचा प्रोटोकॉल अद्याप तयार केलेले नाही. मात्र, देशभरात प्रथमच हत्तीची गणना केली जाणार आहे. प्रशिक्षण प्रक्रिया राबवली जात आहे. काही ठिकाणचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. उर्वरित भागातील प्रशिक्षणाची प्रक्रिया पूर्ण होणे बाकी आहे. ही संपूर्ण प्रक्रिया राबवून आकडेवारी टप्प्याटप्प्याने २०२३ च्या अखेरपर्यंत समोर येणार आहे. सोबतच वाघ आणि बिबट्या याचीही गणना होणार आहे. हत्तींच्या संरक्षणासाठी प्रथम स्थानिक आणि त्या प्रदेशातील लोकांचा सहभाग असण्यावर भर दिला आहे.

हेही वाचा: पावसाच्या सरींनी बाप्पाचे स्वागत; घरोघरी मोरया विराजमान

भारत वगळता, हत्ती आढळत असलेल्या अन्य देशांत आता हत्तींची शिकार वा रहिवासाची ठिकाणे लुप्त होत असल्याने हत्तींची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. म्हणूनच धोक्यात असलेल्या प्रजातींच्या ‘आययूसीएन’ यादीत आशियायी हत्तींचा समावेश करण्यात आला आहे. सध्याच्या गणना अंदाजानुसार जगात आता फक्त ५० हजार ते ६० हजार हत्ती आहेत. यापैकी ६० टक्क्यांहून अधिक हत्ती भारतात आहेत. जागतिक हत्ती दिवस हा हत्तीची बेकायदा शिकार, हस्तिदंताची तस्करी यांना रोखण्यासाठी योग्य धोरण आखणे या मार्गाने हत्तींच्या संवर्धनासंबंधित पुढील दिशा निश्चित करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

"महाराष्ट्रात हत्तीचा अधिवास नसल्याने त्याची गणना केली जाणार नाही. कर्नाटकातून सिंधूदुर्ग जिल्ह्यातील काही भागात पाच ते सहा हत्ती येतात आणि शेताचे नुकसान करतात. त्यानंतर पुन्हा ते परत कर्नाटक निघून जातात. त्यामुळे राज्यात हत्ती गणन केली जाणार नाही."

- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

loading image
go to top