esakal | मुकुल वासनिक की अविनाश पांडे? राज्यसभेसाठी दोघांची नावे चर्चेत
sakal

बोलून बातमी शोधा

मुकुल वासनिक की अविनाश पांडे? राज्यसभेसाठी दोघांची नावे चर्चेत

मुकुल वासनिक की अविनाश पांडे? राज्यसभेसाठी दोघांची नावे चर्चेत

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आपला नंबर लागावा यासाठी महाराष्ट्रात चांगलीच स्पर्धा सुरू आहे. यासाठी माजी केंद्रीय मंत्री तसेच राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांचे नाव आघाडीवर आहे. सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव, नागपूरचे अविनाश पांडे यांचीही नावे चर्चेत आहेत.

मुकुल वासनिक हे सोनिया गांधी यांचे विश्वासू समजले जातात. ते रामटेकचे खासदार होते. केंद्रात मंत्रीही होते. अनेक राज्यांचे प्रभारी होते. आजही ते पक्षात सक्रिय आहेत. त्यामुळे राज्यसभेवर पाठवून जी-२३ गटाला शांत करण्याचाही प्रयत्न केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डॉ. प्रज्ञा सातव यासाठी सर्वाधिक प्रबळ दावेदार मानल्या जातात. राजीव सातव असताना त्या राजकारणात सक्रिय नव्हत्या.

हेही वाचा: भाजपवर आरएसएसचा नव्हे तर अदाणी-अंबाणीचा अंकुश

अलीकडेच प्रदेश कार्यकारिणीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्या सध्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत. राज्याच्या कार्यकारिणीत स्थान देऊन त्यांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा केल्याचे मानले जाते. राहुल गांधी आणि सातव यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांना गुजरातचे प्रभारी करण्यात आले होते. राहुल गांधी यांचा शब्द अंतिम मानल्यास प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

अविनाश पांडे यांना एकदाच राज्यसभेवर संधी देण्यात आली होती. ते सातत्याने दिल्लीत असतात. विविध राज्यांची जबाबदारी सांभाळतात. राजस्थानमध्ये त्यांनी चांगलीच बांधणी केली होती. सध्या राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे आणि त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. दुसरीकडे मुंबईतून माजी खासदार उत्तर भारतीय नेते संजय निरुपम आणि मुंबईचे माजी प्रदेश अध्यक्ष मिलिंद देवरा दोघेही यासाठी उत्सुक असल्याचे समजते. देवरा राहुल गांधी यांच्या युवा चमूतील नेते आहेत.

loading image
go to top