उपराजधानीत ऑक्सिजन तुटवडा कमी करण्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत

उपराजधानीत ऑक्सिजन तुटवडा कमी करण्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत

नागपूर : शहरातील ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen crisis) दूर करण्यासाठी भारतीय हवाई दलाची (Indian Air Force) मदत घेण्यात आली असून आज नागपूर विमानतळावरून (Nagpur International Airport) रात्री नऊ वाजता चार टँकर विशेष विमानाने ओरिसा (Orisa) येथे रवाना करण्यात आले.(Empty Oxygen tankers sent to Orisa from Nagpur with help of Indian Air Force)

उपराजधानीत ऑक्सिजन तुटवडा कमी करण्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत
धक्कादायक! विद्यार्थिनीने दिली चक्क ICU मधून परीक्षा; विद्यापीठाबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष

ओरिसा राज्यातील अंगुल येथून ९० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. येत्या तीन दिवसात ऑक्सिजन भरलेले चार टँकर नागपूरमध्ये दाखल होतील. त्यामुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळेल असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. या संदर्भात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी, परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी घेतला पुढाकार घेतला.

छत्तीसगड व मध्यप्रदेश या राज्यातही कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्याला त्या राज्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे सरासरी ६० ते ७० ट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. दररोज सरासरी पाच टँकर भरून उपलब्ध होत आहे. भिलाई व्यतिरिक्त आज जिल्ह्याला १२२ मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध झाला आहे. रायपूर येथून निको ग्रुपतर्फे दोन टँकरद्वारा सरासरी ४० ते ५० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे.

उपराजधानीत ऑक्सिजन तुटवडा कमी करण्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत
ग्रामीण भागात मृत्युसंख्येत प्रचंड वाढ; आरोग्य विभागाकडे मात्र चाचण्यांचीच नोंद

-नागपूर जिल्ह्यासाठी १४० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता

-नागपूर विभागासाठी एकूण २४० मेट्रिक टनची गरज

-भिलाई येथून एकशे दहा मेट्रिक टन ऑक्सिजनचा कोटा मंजूर

-१९ टँकर भिलाई साठी रवाना करण्यात आले आहेत

(Empty Oxygen tankers sent to Orisa from Nagpur with help of Indian Air Force)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com