
नागपूर : वर्षभरापूर्वी कारागृहातून सुटलेल्या कुख्यात गुंडाची दहशत होती. कुणालाही धमकावून मारहाण करीत असल्यामुळे वस्तीतील नागरिक व मुले त्रस्त होती. अखेर सोमवारी मध्यरात्री १२.१५ ते १ वाजताच्या सुमारास आरोपींनी धारदार शस्त्र आणि दगडाने ठेचून त्याचा खून केला. ही घटना सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोंडवाना चौकात घडली. अजय मुरलीधर गाते (३१) रा. बैरामजी टाऊन, गोंडवाना चौक, आदिवासीनगर खदान असे मृताचे नाव आहे.