नागपुरी ‘ॲप’ करणार कॅनडातील वाहनांची स्पीड नियंत्रित

नागपुरी ‘ॲप’ करणार कॅनडातील वाहनांची स्पीड नियंत्रित

नागपूर : शहरातील काही अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण ‘ॲप’ विकसित केले आहे. त्या ॲपने कॅनडातील ‘सस्काचेवान’ राज्यातील ‘रेजिना’ शहरासाठी रस्ता सुरक्षेची समस्या (Speed informer app) सोडविली आहे. विशेष म्हणजे हे ‘ॲप’ भारतीय महामार्गासाठीही उपयोगी (Also useful for Indian highways) ठरू शकते. विद्यार्थ्यांनी सातासमुद्रापार केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे. (Speed can be controlled by the app)

विदेशात ‘स्पीड लिमिट’ ही नागरिकांची मोठी समस्या आहे. त्यावर बंधन घालण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात दंड आकारले आहेत. मात्र, अनेकदा कार वा मोठी वाहने चालवीत असताना त्यांच्या वेगाचा अंदाज येत नाही. परिणामी वाहनचालकांना दंड बसत असतो. या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी तेथील एका बड्या व्यक्तीने आयटी आयडियाज कंपनीचे प्रताप शुक्ला यांना असे ॲप विकसित करण्याची विनंती केली.

नागपुरी ‘ॲप’ करणार कॅनडातील वाहनांची स्पीड नियंत्रित
केंद्राला डाटा मागणे चुकीचे; मराठा समाजाला कुठून आरक्षण देणार?

त्यानुसार त्यांच्या कंपनीमध्ये इंटर्नशिप करणारे वेदांत बोरटकर, सार्थक कोरे, ललित निखाडे, निधय इंदूरकर, तुषार गभने आणि सुशांत या विद्यार्थ्यांना असे ‘ॲप’ तयार करण्याचे टास्क दिले. विद्यार्थ्यांनी हे ॲप विकसित करून टास्क पूर्ण केले. विशेष म्हणजे हे ‘ॲप’ इंटरनेटशिवायही सेवा देते. त्यामुळे तेथील ॲपल आणि अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी हे ॲप वरदान ठरले आहे.

रेजिना शहराद्वारे कौतुक

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘ॲप’चे रेजिनाच्या नागरिकांनी कौतुक केले आहे. याशिवाय रेजिनामधील सामाजिक संस्था आणि माध्‍यमेदेखील या रस्ते सुरक्षा अ‍ॅपचा नागरिकांमध्‍ये प्रचार करीत आहेत. ॲपची गुणवत्ता आणि उपयुक्तता या वैशिष्ट्य़ांसाठी विद्यार्थ्‍यांचे कौतुक होत आहे.

असे आहे ॲप

कुठल्या रस्त्यावर नेमकी किती स्पीड लिमिट आहे, याची माहिती ॲपमध्ये आहे. त्यामुळे ज्या रस्त्यावर जेवढी स्पीड लिमिट आहे, त्यापेक्षा जास्त स्पीड असल्यास ॲप अलार्म देतो. त्यातून स्पीड नियंत्रणात करून दंडापासून वाचता येणे शक्य होते. याशिवाय अपघातापासूनही वाचता येते.

नागपुरी ‘ॲप’ करणार कॅनडातील वाहनांची स्पीड नियंत्रित
गाव लई न्यारं! महिलाही पुरुषांप्रमाणे करतात खुर्चीवर आराम
सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे ज्ञान व्यवहारामध्‍ये उपयोगात आणण्‍यासाठी मिळालेल्या प्रशिक्षणातून हे साध्य करता आले. ही माझ्यासाठी खूप मोठी संधी होती.
- वेदांत बोरटकर, जे. डी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट

(Speed can be controlled by the app)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com