esakal | आता कामगाराच्या खांद्यावरील सिलिंडरचे ओझे होणार कमी, विदर्भातील तरुणानं शोधला उपाय
sakal

बोलून बातमी शोधा

Gas-Cylinder

आता कामगारांच्या खांद्यावरील सिलिंडरचे ओझे होणार कमी, विदर्भातील तरुणानं शोधला उपाय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : डिजिटलच्या युगातही एलपीजी गॅस सिलिंडर (LPG gas cylinder) घेऊन येणारा व्यक्ती अमानुषपणे खाद्यांवरच त्याचे वहन करीत असल्याचे चित्र सर्वत्र आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या खांद्यावरील ओझे कमी करण्याची किमया यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या प्रशांत मुरलीधर डेहणकर (engineering student prashant dehankar) यांनी सिलिंडर ट्रॉली (trolley for carrying cylingder) तयार करून केली. या भन्नाट जुगाडला इंडियन ऑइल या आघाडीच्या कंपनीने मान्यताही दिली आहे. यामुळे सिलिंडर पोहोचून देणारा व्यक्ती स्मार्ट होणार असून कामाची गुणवत्ताही वाढण्यास मदत होणार आहे. (engineering student made trolley for carrying cylinder)

हेही वाचा: corona positive story : एचआरसीटी स्कोअर १८ तर ऑक्सिजन लेव्हल ८२; मग झाला पुनर्जन्म

कळंब येथील प्रशांतने चिंतामणी गॅस सव्हिसेसच्या माध्यमातून व्यवसायात प्रवेश केला. मात्र, त्याला इंजिनिअऱिगची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. पूर्वी कान लावून अथवा वास घेऊन रेग्युलेटरची तपासणी केली जात होती. संशोधन केल्यानंतर गॅस गळती तपासणारे `मॅनोमिटर' हे यंत्र ए टू झेड इंजिनिअरिंगने विकसित केले. ते यंत्र लवकरच देशभरातील गॅस एजन्सीमध्ये पोहोचले आहे. सर्वत्र डिजीटलायझेशन सुरू असताना सिलिंडरचे वहन करणारा व्यक्ती अमानुषपणे आपल्या खांद्यावर सिलिंडर ओढत असल्याची खंत त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.

याकामासाठी भविष्यात स्मार्ट मुलांची गरज भासणार असल्याचे कंपनीचे कार्यकारी संचालक अमिताभ अखोरी यांनाही पटले. प्रशांतने कार्यकारी संचालकांची भेट घेऊन आव्हान स्वीकारले. गावाजवळच सिलिंडरची ट्रॉली तयार केली. सिलिंडरचे वजन आणि घर्षणामुळे सतत चाक तुटत होते. ते मजबूत कसे करता येईल यासाठी त्यांनी शोध घेतला. हा प्रयोग सलग एक वर्ष चालला. दरम्यान, कोईम्बतूर येथील एका कंपनीकडून थर्मोप्लास्टिक पॉलीयुरेथिन या मटेरियलपासून तयार केलेले चाक त्या ट्रॉलीला बसविले. ५० सिलिंडर दररोज वहन केल्यानंतरही ट्रॉलीचे चाक सुस्थितीत राहू लागले. संबंधित कंपनीनेही चाके तयार करण्याची हमी दिल्यानंतर ट्रॉलीला इंडियन ऑइल कंपनीने मान्यताही दिली. या प्रयोगासाठी साहाय्यच व्यवस्थापक नीलेश ठाकरे आणि नागपूर विभागीय व्यवस्थापक अनिल मेहर यांनी सहकार्य केले.