पावसाअभावी जलसाठे घटले, जुलै कोरडा गेल्यास नागपूरवर जलसंकट

dam
dame sakal
Updated on

नागपूर : दोन वर्षांपूर्वी जुलैमध्येच नागपूरकरांनी (nagpur) दिवसाआड पाणीपुरवठ्याचा अनुभव घेतला. पावसाने यंदाही दडी मारली असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह येथील पेच धरणात (pench dam) अल्प जलसाठा असून नवेगाव खैरी (navegaon khairi dam) कोरडे पडले आहे. पावसाची अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शहराला जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो. (enough water not available in lake in nagpur)

dam
प्रेयसीने दिली होती टीप; अवनी ज्वेलर्सवरील दरोड्याचा छडा

मागील वर्षी पाऊस बऱ्यापैकी झाल्याने जलसाठे तुडूंब भरले होते. त्यामुळे यावर्षीचा उन्हाळा नागपूरकरांना सहज गेला. परंतु, यंदा अद्याप पावसाने जोर धरला नसल्याने शहराला पाणीपुरवठा करणारे जलसाठे रिकामे होत असल्याचे चित्र आहे. २०१९ मध्ये याच महिन्यात नागपूरकरांना दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय महापालिकेला घ्यावा लागला होता. त्यावेळी तोतलाडोह येथील पेच धरण रिते झाले होते. एवढेच नव्हे मृतसाठाही वापरण्यात आला होता. यंदा नवेगाव खैरी येथील धरण कोरडे पडले आहे. मागील वर्षी हे धरण ९० टक्के भरले होते. परंतु, यंदा या धरणात शून्य टक्के अर्थात पाणीच नसल्याचे जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीतून दिसून येत आहे. याशिवाय शहराला मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होणाऱ्या तोतलाडोह येथील पेच धरणातील पाणीसाठाही सातत्याने कमी होत आहे. आज या धरणात ६०.६६ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी आजच्या तारखेत हे धरण ७७.४६ टक्के भरले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा या धरणात १७ टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. एवढेच नव्हे तर महिनाभरापूर्वी या धरणात ६३.५ टक्के पाणीसाठा होता. जून महिना संपूर्ण कोरडा गेला असून जुलैचा पहिल्या आठवड्यातही पावसाने हजेरी लावली नाही. परिणामी सद्यःस्थितीतील पाण्याचाच शहराला पुरवठा होत आहे. परिणामी महिनाभरात हे धरणातील पाणी साडेतीन टक्क्यांनी कमी झाले. पुढील काही दिवस पाऊस न आल्यास हे धरणही नवेगाव खैरीप्रमाणे रिते होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी पुढील उन्हाळ्यात नागपूरकरांना जलसंकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. कन्हान नदीतून शहरातील काही झोनला पाणीपुरवठा होतो. नदीलाही पुरेसे पाणी नसल्याने संकटात आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत.

सरासरीपेक्षा पाऊस जास्त -

जिल्ह्यात आतापर्यंत २०० मिलिमीटर पाऊस पडला. हा पाऊस सरासरीपेक्षा ९ टक्क्यांनी जास्त आहे. परंतु जलसाठ्यांच्या परिसरात अल्प पाऊस पडल्याने जलसाठ्यात वाढ झाली नसल्याचे समजते.

जलसाठ्यातील ६ जुलै रोजी पाण्याची स्थिती

  • जलसाठे सद्यःस्थितीत पाणीसाठा मागील वर्षी पाणीसाठा

  • तोतलाडोह ६०.६६ टक्के ७७.४६ टक्के

  • नवेगाव खैरी ० टक्के ९०.०४ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com