esakal | भिवापूर वगळता अख्ख्या नागपूर जिल्हयाला झाला संसर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

khapa

प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या तरी संसर्ग कमी होण्याचे नाव घेत नाही. बाधितांचा आलेख दिवसेंदिवस झपाटयाने वाढताना दिसतो. कामठीत बुधवारी 29 रूग्ण आढळल्यामुळे तालुक्‍याचे ग्रहण सुटता सुटत नसल्याचे दिसून येते. सदया भिवापूर तालुका मात्र या संसर्गापासून दूर आहे.

भिवापूर वगळता अख्ख्या नागपूर जिल्हयाला झाला संसर्ग

sakal_logo
By
विजयकुमार राऊत

नागपूर ग्रामीण : अख्खा जिल्हा आता कोरोनाग्रस्त झाल्याने ग्रामीण भागातील संसर्ग मोठया प्रमाणात वाढत आहे. प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या तरी संसर्ग कमी होण्याचे नाव घेत नाही. बाधितांचा आलेख दिवसेंदिवस झपाटयाने वाढताना दिसतो. कामठीत बुधवारी 29 रूग्ण आढळल्यामुळे तालुक्‍याचे ग्रहण सुटता सुटत नसल्याचे दिसून येते. सदया भिवापूर तालुका मात्र या संसर्गापासून दूर आहे.

कामठीच्या नगराध्यक्षांसह 27 पॉझिटिव्ह
कामठी : तालुक्‍यात दरदिवसाला बाधितांचा आकडा फुगत असताना कामठीचे नगराध्यक्ष मो. शहजहॉं शफाहत कोरोनाच्या विळख्यात सापडले. त्यांना नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज असले, तरी शहरासह ग्रामीण भागात कोरोनाची साखळी मात्र कायम आहे. मागील एक आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढीवर असून, आज पुन्हा 27 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. आजपावेतो तालुक्‍यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 258 वर पोहोचली आहे. कामठीचे नगराध्यक्ष मो. शहजहा शफाहत कोरोनाच्या विळख्यात सापडले असून, त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने मंगळवारी सायंकाळी नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांची बायपास सर्जरी होणार होती. त्याकरिता त्यांच्या विविध तपासणींसह स्वॅब नमुने तपासणी करण्यात आली असता, बुधवारी त्यांचा तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला. असल्याने पुढील उपचारासाठी मेयो रुग्णालयात "रेफर' करण्यात आले.

अधिक वाचा : ती म्हणाली, आता तू माझी बायको आणि माझ्या नवऱ्याचीही...

12 दिवसांच्या विश्रांतीनंतर हिंगण्यात आढळले सहा रुग्ण
हिंगणा एमआयडीसी : तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या 12 दिवसांपासून थांबली होती. मात्र, आज 6 पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने आता तालुक्‍यातील एकूण रुग्णसंख्या वाढून 142 झाली आहे. यामध्ये न. प. वानाडोंगरी क्षेत्रातील गजानन कॉलनी 2, राजीवनगर 1 व महाजनवाडी 1 यांचा समावेश आहे. याआधी न. प. वानाडोंगरी क्षेत्रातील एकूण 11 पॉझिटिव्ह पैकी 10 नंतर निगेटिव्ह आले होते, अशी माहिती मुख्याधिकारी भारत नंदनवार यांनी दिली. तालुक्‍यातील ग्रामपंचायत नीलडोहअंतर्गतच्या अमरनगर येथे आज 1 व ग्रामपंचायत डिगडोह देवी क्षेत्रातील पोलिसनगर येथे 1 पॉझिटिव्ह मिळाले.

अधिक वाचा :नागपूर जिल्हयातील "या' तालुक्‍यात आहे कोरोनाचा कहर, आतापर्यंत चौघांचा मृत्यू

पारडसिंग्यात किराणा दुकानदार, कपडेविक्रेता पॉझिटिव्ह
काटोल : तालुक्‍यात पारडसिंगा येथे बुधवारी सुरू असलेल्या रॅपिड अँटी टेस्ट मोहिमेत दोन कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यांना नागपूर आयजीएमसी (मेयो) येथे हलविले आहे. याशिवाय त्यांच्या संपर्कात आलेल्या 13 संशयितांना पारडसिंगा केअर सेंटरला विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशांक व्यवहारे यांनी सांगितले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकतीच काटोल व नरखेड तालुक्‍यातील कोरोना आढावा व उपाययोजनेबाबत सभा घेतली होती. त्यामुळे काटोल ग्रामीण रुग्णालयांतर्गत व ग्रामीण भागात घरोघरी जाऊन सर्व्हे व स्थानिक खासगी रुग्णालयाकडून येणारे सर्दी, पडसे, खोकला आदी तत्सम लक्षणे असलेल्या रुग्णांची यादी रुग्णालयाला संपर्क नंबरसह पुरविली जात आहेत. त्या कारवाईत आतापर्यंत सुमारे एक हजार नमुन्यांची तपासणी मोहीम पार पडली. मोहिमेत मंगळवारी 57 तर बुधवारी 84 नमुन्यांची तपासणी केली आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भागातसुद्धा टेस्ट सुरू आहे. या मोहिमेत पारडसिंगा येथील किराणा दुकानदार व दुसरा गावोगावी जाऊन कपडे विकणारा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात अजून किती मंडळी आलेली आहे, त्याचीसुद्धा माहिती व टेस्ट घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अधिक वाचा : गृहमंत्री थेट पोहोचले सिहोरा वाळूघाटावर आणि फर्माविले की...

ऑटोचालक व पोलिसाला संसर्ग
रामटेकः पोलिस कर्मचारी व ऑटोचालक यांची स्वॅब टेस्ट करण्यात आली. त्यात एक पोलिस हवालदार व एक ऑटोचालक दोघे जण "पॉझिटिव्ह' आढळले. पोलिस हवालदार हे कामठी येथून ये-जा करीत असल्याने त्यांच्याबाबतीत कामठी प्रशासनाला माहिती देण्यात आली; तर ऑटोचालक हा सुभाष वॉर्डातील रहिवासी असून, दोघांनाही नागपूर येथे पाठवण्यात आले. शहरात एकेक विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची स्वॅब टेस्ट घेण्यात येत आहे. आज पोलिस विभाग आणि शहरातील ऑटोचालकांची स्वॅब टेस्ट करण्यात आली. पोलिस विभागातील 56 वर्षीय पोलिस हवालदार पॉझिटिव्ह आढळले.

संपादन  : विजयकुमार राऊत