esakal | ‘एस्कॉर्ट सर्व्हिस’ सायबर गुन्हेगारांचा ‘ट्रॅप’
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

‘एस्कॉर्ट सर्व्हिस’ सायबर गुन्हेगारांचा ‘ट्रॅप’

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : ऑनलाईन (Online) वेबसाईटवर सर्फिंग करणाऱ्या किंवा सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या आंबटशौकिनांना ‘एस्कॉर्ट सर्व्हिस’च्या नावाने ‘ट्रॅप’ करीत आहेत. ‘आपल्या शहरातील हॉट तरुणी एका फोनवर’ अशी थाप मारून सापळ्यात अडकवितात. नोंदणी शुल्कपासून ते हॉटेलमधील रूमपर्यंत पोहोचेपर्यंत व्यक्तीला जवळपास ४० ते ५० हजारांना चुना लागलेला असतो.

सायबर गुन्हेगार विशिष्ट मोबाईल नंबर सोशल मीडियामार्फत प्रसारित करून ‘एस्कॉर्ट सर्विस’साठी तरुणी उपलब्ध असल्याची बतावणी करतात. या ट्रॅपमध्ये अनेक आंबटशौकीन अडकतात. हव्यास आणि लालसेपोटी अनेक जण सोशल मीडियावरून प्रसारित झालेल्या क्रमांकावर फोन करतात किंवा व्हॉट्सॲपर संपर्क साधतात. विशिष्ट मोबाईल क्रमांक देऊन सेक्स सर्व्हिस सुरू असून यावर फोन केल्यास तरूणी उपलब्ध होणार अशी बतावणी केल्या जाते. तसेच पुरुष असल्यास ‘जिगोलो’ किंवा सेक्स वर्कर म्हणून काम केल्यास बक्कळ पैसा मिळेल, असे सांगतात. त्यामुळे अशा क्रमांकावर फोन करण्यासाठी आंबटशौकिनांसह झटपट पैसे कमावण्यासाठी देहव्यापार करण्यास तयार असलेल्या तरुण-तरुणीही कॉल करतात. त्यांना नोंदणी शुल्क म्हणून सुरुवातीला काही रुपये भरण्यास सांगतात. त्यांनी सांगितलेली शुल्काची रक्कम भरली तरी कोणताही लाभ होत नाही. उलट नोंदणी फी, हॉटेल, तिकीट बुकिंग अशा विविध कारणावर हजारो रुपयांची लूट करण्यात येते.

हेही वाचा: रस्ते दुरुस्तीसाठी अखेर फेरनिविदा; एक हजार १२६ कोटी रुपयांची कामे होणार

मुलींचे फोटो पाठवतात

सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकल्यानंतर शुल्काच्या नावावर पैसे घेतल्यानंतर लगेच व्हॉट्सॲपर सुंदर मुलींचे फोटो पाठविले जातात. त्यापैकी मुलींची निवड करण्यास सांगतात. निवडलेल्या मुलीसाठी २० ते ३० हजार रुपये भरण्यास सांगतात. पैसे भरल्यानंतर त्यांना आपल्याच शहरातील हॉटेलचे नाव आणि रूम नंबर सांगतात. हॉटेलचे भाडे आणि अन्य खर्च म्हणून आणखी पैसे भरण्यास सांगतात. अशाप्रकारे फसवणूक केल्या जाते.

आपला नंबर आणि फोटो पॉर्न वेबसाईटवर

सायबर गुन्हेगाराने सांगितलेली रक्कम न भरल्यास थेट आपली माहिती पॉर्न वेबसाईटवर फोटो, मोबाईल नंबरसह टाकल्या जाते. या नंबरवर जिगोलो किंवा सेक्स वर्कर उपलब्ध आहे, असे वर्णन केल्या जाते. त्यामुळे त्या व्यक्तीला आंबटशौकीनांचे दिवसभर फोन येणे सुरू होते. तो व्यक्ती मानसिकरित्या त्रस्त होतो.

हेही वाचा: रेल्वे गॅंगमन रुळाची पाहणी करताना कुख्यात गुन्हेगाराने फोडले डोके, सोन्याचे पदकही लूटले

ऑनलाईन ‘एस्कॉर्ट सेक्स सर्व्हिस’च्या नावाने सायबर गुन्हेगार मॅसेजव्दारे किंवा लोकेंटो सारख्या वेबसाईटवर लूटमारीचे जाळे टाकून ठेवतात. येथे फोन करून रजिस्ट्रेशनच्या विकृत जाळ्यात अडकू नका. यावर वेगवेगळ्या फी भरण्यास लावून केवळ फसवणूक करण्यात येते. अशी कोणतीही सर्व्हिस प्रत्यक्षात मिळत नसते. आपले डीपी व सोशल मीडियावरील फोटो बदनामी करिता मोबाईल नंबर सह पोर्न साईटवर पाठविले जावू नये यासाठी ते नेहमी सुरक्षित करून ठेवा. कोणी अशा प्रकारे त्रास देत असेल तर नजिकच्या सायबर सेलमध्ये तक्रार करा.'

- केशव वाघ, सायबर क्राईम, नागपूर

loading image
go to top