नागपूर - भारतीय वायुसेनेत १६ वर्षे सक्रिय सेवा बजावलेले माजी सार्जंट संदेश सिंगलकर यांनी पुन्हा एकदा देशसेवेसाठी पुढे येण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी भारतीय वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांना पत्र लिहून पुन्हा सेवेत रुजू होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.