esakal | मशिदीवरील भोंगे बंद करण्यासाठी थेट गृहमंत्र्यांना पत्र...काय आहे कारण

बोलून बातमी शोधा

bhonge

परीक्षेच्या काळात कुटुंबांमध्ये टी.व्ही. आणि रेडिओही बंद ठेवतात. असं असताना दिवसातून पाच वेळा मशिदीवरील भोंग्यातून नमाज पठण केलं जातं. त्या आवाजाने विद्यार्थ्यांना त्रास होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या काळात हे लाऊड स्पिकर्स बंद ठेवण्यात यावे अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

मशिदीवरील भोंगे बंद करण्यासाठी थेट गृहमंत्र्यांना पत्र...काय आहे कारण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : परीक्षेचा हा काळ विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. त्यांच्या भविष्यासाठी हे महत्त्वाचे दिवस असल्यामुळे परीक्षेच्या काळात मशिदीवरचे लाऊड स्पिकर बंद ठेवण्यात यावे, अशी मागणी नागपूर जिल्ह्याचे युवा सेनाप्रमुख विक्रम राठोड यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलंय. त्यात ही मागणी करण्यात आली आहे.
परीक्षेच्या काळात कुटुंबांमध्ये टी.व्ही. आणि रेडिओही बंद ठेवतात. असं असताना दिवसातून पाच वेळा मशिदीवरील भोंग्यातून नमाज पठण केलं जातं. त्या आवाजाने विद्यार्थ्यांना त्रास होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या काळात हे लाऊड स्पिकर्स बंद ठेवण्यात यावे अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

सविस्तर वाचा - महाशिवरात्रीला भांग पिताना घ्या या सहा गोष्टींची काळजी...अन्यथा भोगावे लागतील परिणाम

वाद होण्याची शक्‍यता
शिवसेनेच्या युवा नेत्याच्या या मागणीमुळे वाद होण्याची शक्‍यता आहे. आत्तापर्यंत शिवसेना नेत्यांनी अशी भूमिका घेणं यात काही वेगळं समजलं जात नव्हतं. मात्र राज्यात महाआघाडीचं सरकार आल्यामुळे शिवसेनेने अशी भूमिका घेणे हा चर्चेचा विषय आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना या मागणीचं निवेदन दिले आहे.

शिवसेनेच्या अधिकृृत भूमिकेकडे लक्ष
विरोधी पक्षात असताना शिवसेनेने या आधी अनेकदा अशा प्रकारची भूमिका मांडली होती. राज्यात त्यावर वादही झाले होते. मात्र आता असे वादाचे विषय टाळण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेनेनं कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून सरकार तयार केल्याने शिवसेनेची आक्रमक भूमिका मवाळ झालीय असं बोललं जातं. त्यामुळे शिवसेना यावर काय अधिकृत भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.