विद्यार्थ्यांनो! गुरुवारपासून विद्यापीठाच्या परीक्षा, असे करा 'लॉग इन'; वाचा पेपर पॅटर्न

exam of nagpur university starts from thursday
exam of nagpur university starts from thursday
Updated on: 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा (२०२०) २५ मार्चपासून सुरू होणार आहेत. यावेळी प्रथमच संकेतस्थळावरुन (वेबबेस्ड) परीक्षा घेण्यात येणार आहेत. याबाबत विद्यापीठाने सोमवारी रात्री उशिरा दिशानिर्देश जारी केले आहेत. 

पहिल्या टप्प्यात बी.एस्सी., बी.कॉम., बीसीए, बी.फॉर्म, बीबीए, बीए, एलएलबी व इतर अभ्यासक्रमांची परीक्षा सुरू होणार आहेत. यावेळी परीक्षेसाठी 'अ‌ॅप' नसून परीक्षा संकेतस्थळावरुन (वेबबेस्ड) घेण्यात येणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांना संगणक वा कोणत्याही अ‌ॅन्ड्राईड मोबाईलवर पेपर देता येणे शक्य होणार आहे. संगणकासाठी विद्यार्थ्यांकडे वेबकॅम असणे आवश्यक राहणार आहे. विद्यार्थ्यांना सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य असेल. परीक्षेत मिक्स प्रकाराचे प्रश्न असतील. कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी 'प्रॉक्टोरिंग'चीही व्यवस्था केली जाणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर याविषयीचा माहिती उपलब्ध आहे. 

असा असेल पेपर पॅटर्न - 

  • एक तासात ४० प्रश्न सोडवावे लागणार 
  • लॅपटॉप, मोबाईल, टॅबलेटवर देता येणार पेपर 
  • चांगल्या इंटरनेट कनेक्टीव्हीटी असणे गरजेचे 
  • विद्यार्थ्यांना परीक्षा देताना, कॅमेरा चेहऱ्यावर असणे, कुठलाही आवाज न करणे, न हलता परीक्षा देणे, वायफाय आणि राऊटरचा उपयोग करणे 

पोर्टल सुरू करताना - 

प्रथम पायरी 
https://www.rtmnu.net या संकेतस्थळावर क्लिक करून लोकेशन अलाऊ करणे, कॅमेरा अ‌ॅक्सेस करणे, मायक्रोफोन अ‌ॅक्सेस करणे 

दुसरी पायरी 
लॉगीन करणे - युजर नेम व पासवर्ड टाकणे, कॅपचा साठी क्लिक करणे, शाखा निवडणे, अभ्यासक्रमाचे नाव निवडणे, मीडियम निवडणे, सत्र निवडणे 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com