
नागपूर : कशी होणार निर्विघ्न परीक्षा?
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे उन्हाळी परीक्षा ऑफलाइन पण बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेद्वारे घेण्यात येणार आहे. मात्र, या परीक्षा घेत असताना त्या निर्विघ्नपणे घेण्यासाठी विद्यापीठासमोर असंख्य अडचणी आहेत. त्यामुळे त्या अडचणींची शर्यत विद्यापीठ कशी काय जिंकणार हा प्रश्न आता निर्माण होताना दिसून येत आहे.
नागपूर विद्यापीठाने शुक्रवारी विद्वत परिषदेची बैठकीत परीक्षा नेमक्या कोणत्या पद्धतीने घेण्यात यावी याबाबत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये एकीकडे ऑफलाइन परीक्षा घेण्याचे ठरले. मात्र, दुसरीकडे त्यात बहुपर्यायी प्रश्न आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या महाविद्यालयात परीक्षा होणार असल्याचे नमुद करण्यात आले. तसेच परीक्षेत ५० प्रश्न राहणार असून यापैकी ४० प्रश्न ९० मिनिटात सोडवावे लागणार आहेत. महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका या विद्यापीठाकडून पाठवल्या जाणार आहेत. प्रत्येक पेपरमध्ये दोन दिवसांचा अवधी दिला जाणार आहे. तसेच एका दिवशी तीन सत्रात या परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे.
होम सेंटरवर परीक्षांचा विचार करता, या प्रश्नपत्रिका विद्यापीठ महाविद्यालयांपर्यंत कशा काय पोहचविणार? हा प्रश्न आहे. विद्यापीठाद्वारे गेल्या चार ते पाच वर्षांपासून महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीने प्रश्नपत्रिका पाठविण्यात येतात. त्यासाठी विद्यापीठाने ठरविलेल्या १७५ पेक्षा अधिक केंद्रावर हायस्पीड प्रिंटर, लॅपटाप आणि इतर सुविधा दिल्या आहेत. या सुविधा आता संलग्नित ६०० पैकी किती महाविद्यालयात आहेत काय? हा प्रश्न आहे.
विद्यापीठाद्वारे यंदा प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेसाठी ‘ओएमआर’ शिटचा वापर करण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका वा उत्तरपत्रिकेच्या छपाईचे काम देताना, त्यासाठी किमान एक महिन्यापूर्वी द्यावी लागते. ही बाब अत्यंत गोपनिय असते. त्यामुळे स्थानिक वा ओळखीच्या व्यक्तींकडून त्याची छपाई होत नाही. विद्यापीठाजवळ पंधराही दिवस नसल्याने या ‘ओएमआर’शिट वेळेत मिळतील का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ती वेळेत मिळाली तरीही विद्यापीठाद्वारे महाविद्यालयांमध्ये त्या पोहचवायच्या असल्यास त्यासाठी इतके मनुष्यबळ विद्यापीठाजवळ आहे का? हाही प्रश्न निर्माण होतो आहे.
प्रमुख समस्या
६०० पैकी किती महाविद्यालयात सुविधा?
विद्यापीठ या केंद्रावर फॅसिलिटी देणार का?
पंधरा दिवसात प्रश्नपत्रिकांचे प्रिंटिंग शक्य आहे काय?
मनुष्यबळाअभावी प्रश्नपत्रिका केंद्रावर पोहचविणार कशा?
प्रमुख समस्या
६०० पैकी किती महाविद्यालयात सुविधा?
विद्यापीठ या केंद्रावर फॅसिलिटी देणार का?
पंधरा दिवसात प्रश्नपत्रिकांचे प्रिंटिंग शक्य आहे काय?
मनुष्यबळाअभावी प्रश्नपत्रिका केंद्रावर पोहचविणार कशा?
Web Title: Exam Offline By Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..