प्राध्यापकाने दोन महाविद्यालयांना आणले अडचणीत! पैशाची वसुली

प्राध्यापकाने दोन महाविद्यालयांना आणले अडचणीत! पैशाची वसुली
Updated on

नागपूर : विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेदरम्यान (Winter exams) एका महाविद्यालयाने ऑनलाइन परीक्षेऐवजी ऑफलाइन परीक्षेचे आयोजन करीत विद्यार्थ्यांना सर्व पेपरमध्ये पास करून देण्याच्या नावावर पैसे मागण्यात येत असल्याची ‘ऑडिओ क्लिप’ व्हायरल झाली. या महाविद्यालयातील परीक्षा रद्द (College exams canceled) करीत या घटनेची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने दोन सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीच्या तपासात पैसे मागणारा प्राध्यापक दुसऱ्याच महाविद्यालयाचा (The professor asking for money is from another college) असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे विद्यापीठाने याही महाविद्यालयाची परीक्षा स्थगित केली आहे. (Examination-postponed-due-to-recovery-of-money-from-students)

विद्यापीठाद्वारे पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रथम सत्राच्या परीक्षा महाविद्यालयस्तरावर घेण्याचे निर्देश दिलेत. यानुसार ५ ते ३१ मेदरम्यान पेपर घेण्यात येणार आहेत. यापूर्वीच पेपर दिल्यावर त्याचे उत्तर विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर देण्याचा प्रकार समोर आला. मात्र, यावेळी गोंदियातील किरसाल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या एमबीए अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयाने ५ मे रोजी सुरू झालेल्या प्रथम सेमिस्टरच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण करण्याकरिता चक्क पैशाची मागणी केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.

प्राध्यापकाने दोन महाविद्यालयांना आणले अडचणीत! पैशाची वसुली
आजपासून मॉन्सून सक्रिय; जोरदार पावसाचे संकेत

या प्रकाराने एकच खळबळ उडाली होती. त्यानुसार संबंधित महाविद्यालयाच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय त्यांना याबाबत उत्तर सादर करण्यास सांगितले. दरम्यान परीक्षा मंडळाच्या बैठकीत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. कविश्वर आणि व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. उर्मिला डबीर यांची समिती तयार करण्यात आली.

या समितीने महाविद्यालयाची चौकशी केली. या तपासणीत पैसे मागणारा प्राध्यापक हा गोंदियातील अग्रवाल महाविद्यालयात नोकरी करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्याचीही साक्ष नोंदविण्यात आली असून या महाविद्यालयाच्या परीक्षा विद्यापीठ घेणार असल्याचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी सांगितले. चौकशीत काही विद्यार्थ्यांनी पैसे दिल्याचे समोर आले आहे.

(Examination-postponed-due-to-recovery-of-money-from-students)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com