नागपूर : मिठाईवरील ‘एक्स्पायरी डेट’ गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sweet shops
नागपूर : मिठाईवरील ‘एक्स्पायरी डेट’ गायब

नागपूर : मिठाईवरील ‘एक्स्पायरी डेट’ गायब

नागपूर : अन्न व औषधी प्रशासनाने (Food and Drug Administration)मिठाईची खुल्या स्वरूपात विक्री करताना 'एक्स्पायरी डेट' (expiry date)किंवा मिठाई वापराची 'बेस्ट बिफोर डेट'(Expiration date) नमूद करण्याच्या नियमाला व्यापाऱ्यांकडून तिलांजली दिली जात आहे. एक ऑक्टोबरपासून मिठाई विक्रेत्यांना 'एक्स्पायरी डेट' लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, परंतु विक्रेत्यांनी त्याला केराची टोपली दाखविली आहे. मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti)निमित्ताने अनेक नागरिक भेट म्हणून तीळ गुळाचे लाडू भेट देत असतात. दरम्यान, त्यांना नियमाकडे दुर्लक्ष केल्याचे उघडकीस आले आहे.

हेही वाचा: कोरोना होम टेस्टमध्ये 3549 पॉझिटिव्ह - किशोरी पेडणेकर

सणांच्या काळामध्ये मिठाईमध्ये भेसळ मोठ्या प्रमाणात होते. त्यात मिठाई किती दिवसांपर्यंत वापरता येईल, त्याचा निश्चित कालावधी किती याची कोणतीच माहिती नसते. यामुळे एक ऑक्टोबरपासून खुल्या मिठाई विकताना विक्रेत्यांना 'मिठाई ट्रे'समोर सर्वोत्तम वापराच्या तारखेचा फलक (बेस्ट बिफोर डेट) लावणे बंधनकारक करण्यात आले. शहरातील मोजकी दुकान वगळता सर्वत्र फलक न लावता खुलेआम विक्री सुरू आहे. शहरातील सीताबर्डी, महाल, गांधीबाग, सदर, सक्करदरा, नंदनवन, खामला, त्रिमूर्ती नगर, धंतोली, रामदासपेठ, अशा मोठ्या बाजारपेठांसह छोट्या बाजारपेठांमधील दुकानांमध्ये फलक नाहीत. सणांच्या तोंडावर देशभर हा निर्णय घेण्यात आला अन्न व औषध प्रशासनाचे त्यावर नियंत्रण असणार आहे, परंतु विभागाचे काहीच नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: UP निवडणुकांसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, योगींचा मतदारसंघ ठरला

भारतीय अन्न सुरक्षा मानके प्राधिकरणाच्या आदेशानंतर खुली मिठाई विकताना विक्रेत्यांना मिठाईसमोर 'सर्वोत्तम वापराच्या तारखे'चा फलक (बेस्ट बिफोर डेट) लावणे बंधनकारक करण्यात आले. यामध्ये मिठाईच्या उत्पादनाची तारीख टाकणे बंधनकारक नसले तरी, मिठाई विक्रेते स्वेच्छेने ही माहिती ग्राहकांना देऊ शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. एक ऑक्टोबरपासून नियमाची अंमलबजावणी सुरू झाली असून, अन्न व औषध प्रशासनाने शहरातील मिठाई विक्रेत्यांना त्याबाबत निर्देश दिले होते. सणांच्या काळात खवा, मिठाईला मोठी मागणी असते. शिळी मिठाई खाल्याने अनेकदा अन्न विषबाधा होण्याच्या घटना समोर येतात. असे प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.(Nagpur News)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top