

Facelift Surgery
sakal
नागपूर : आजच्या युगात सौंदर्याची व्याख्या झपाट्याने बदलत आहे. सोशल मीडियावरील चमकदार जग, परिपूर्ण त्वचेचे आदर्श आणि नेहमी तरुण दिसण्याची धडपड यामुळे आता फेसलिफ्ट सर्जरीकडे तरुणाई मोठ्या प्रमाणावर आकर्षित होताना दिसते. पूर्वी ही प्रक्रिया मध्यमवयीन किंवा वृद्धांमध्ये लोकप्रिय होती. परंतु, आता २५ ते ३५ वर्षे वयोगटातील युवक-युवतीदेखील या शस्त्रक्रियेकडे वळत आहेत.