esakal | विद्यार्थ्यांनो, परीक्षेत संधी हुकली तर घाबरू नका; तक्रारीसाठी ‘कॉलेज लॉगीन’ला सोय
sakal

बोलून बातमी शोधा

Facilitate college login for students to lodge complaints

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात तक्रार नोंदवायची असताना, ते विद्यापीठाचे परीक्षा भवन गाठून तक्रार नोंदवीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी सुविधा म्हणून विद्यापीठाच्या वतीने आता महाविद्यालयस्तरावर तक्रार नोंदविण्याच्या दृष्टीने ‘ऑनलाइन तक्रार’ अर्जाची सोय करून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनो, परीक्षेत संधी हुकली तर घाबरू नका; तक्रारीसाठी ‘कॉलेज लॉगीन’ला सोय

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा सुरू आहेत. मात्र, परीक्षेदरम्यान अनेक विद्यार्थ्यांना इंटरनेट कनेक्टीव्हीटीमुळे परीक्षा देता आलेली नाही. या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा होईल किंवा नाही अशी भीती निर्माण होते. मात्र, आता विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली तरी त्यांनी न घाबरता, थेट महाविद्यालयाशी संपर्क साधून तक्रार करावी लागणार आहे. महाविद्यालयाद्वारे थेट कॉलेज लॉगीनमधून विद्यापीठाकडे त्याची तक्रार नोंदविता येणार आहे. विद्यापीठाद्वारे संकेतस्थळावर तशी सोय करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, याबाबत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात तक्रार नोंदवायची असताना, ते विद्यापीठाचे परीक्षा भवन गाठून तक्रार नोंदवीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी सुविधा म्हणून विद्यापीठाच्या वतीने आता महाविद्यालयस्तरावर तक्रार नोंदविण्याच्या दृष्टीने ‘ऑनलाइन तक्रार’ अर्जाची सोय करून देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांकडे तक्रार नोंदवावी लागणार आहे. प्राचार्यांना ती तक्रार कॉलेज लॉगीनच्या माध्यमातून विद्यापीठाकडे पाठवावी लागणार आहे. यानंतर विद्यापीठाद्वारे त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. 

अधिक वाचा - कुख्यात गुंड रणजित सफेलकरवर माजी मंत्र्यांचा वरदहस्त, पाच-पन्नास रुपायांची सवारी मारणारा ऑटोचालक झाला कोट्यधीश

...तर फेरपरीक्षा नाही

विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी ४० पैकी २५ प्रश्न सोडविली आहेत, असे आढळून आल्यास त्या विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीची विद्यापीठाकडून दखल घेण्यात येणार नसल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी दिली आहे.

अशी द्यावी लागणार कारणे 

  • इंटरनेट कनेक्टीव्हीटी नसणे 
  • परीक्षा वेळेत सुरू न होणे 
  • परीक्षेसाठी कमी वेळ मिळणे 
  • अचानक लॉगआऊट होणे 
  • लॉगीन न होणे 
  • एरर दाखवून पिवळे बॅकग्राऊंड दिसणे 
  • कॅमेरा वा जीओटॅग ॲक्टिव्ह नसणे 
  • ऑनलाइन परीक्षेसाठी अपील करता न येणे 
  • विषय नोंदविता न येणे 
  • इतर दुसरे कारण
loading image
go to top