Fake Voter: बोगस मतदार नोंदणी, खरा मास्टर माईंड कोण? काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांचा निवडणूक आयोगाला सवाल
Rajura Voter Fraud: राजुरा विधानसभा मतदारसंघात ६,८६१ बनावट मतदार नोंदणीचा प्रयत्न महाराष्ट्र निवडणूक आयोगाने तत्काळ रोखला. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी या सर्व प्रकारातील खरा मास्टरमाईंड कोण? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
चंद्रपूर : राजुरा विधानसभा मतदारसंघात ६ हजार ८६१ बनावट मतदार नोंदणीचा मोठा प्रयत्न महाराष्ट्र निवडणूक आयोगाने तत्काळ कारवाई करून रोखला असल्याची माहिती जाहीर केलेल्या पत्रकातून समोर आली आहे.