Nagpur News : मृत्यू झाला समजून कुटुंबीयांनी केले पिंडदान; ३५ वर्षांनंतर जिवंत असल्याचे कळले, गीताबाई परतली कुटुंबात

Mental Health : विस्मरण आजारामुळे पस्तीस वर्षांपूर्वी घर सोडून गेलेल्या गीताबाईंना कुटुंबीयांनी मृत समजून पिंडदान केले. पण दोन दिवसांपूर्वी त्यांना जिवंत असल्याची माहिती मिळाल्यावर कुटुंबीय आश्चर्यचकित झाले.
Nagpur News
Nagpur News sakal
Updated on

नागपूर : विस्मरण आजारामुळे पस्तीस वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेलेल्या ‘गीता’यांचा दहा ते बारा वर्षे कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र त्या सापडल्या नाही. यामुळे कुटुंबीयांनी श्राद्ध केले. मात्र अचानक दोन दिवसांपूर्वी ‘गीताबाई’ जिवंत असल्याचे कुटुंबीयांना मनोरुग्णालय प्रशासनाने कळविताच कुटुंबाला धक्का बसला. दुसऱ्याच दिवशी सारे कुटुंबीय उपराजधानीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या गीताबाईला परत नेण्यासाठी आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com