bacchu kadu
sakal
नागपूर - ‘आमचे आंदोलन संपलेले नाही तर स्थगित झाले आहे. उद्या सरकारने पुन्हा काही कारस्थान केले तर आम्ही तयार आहोत. आम्ही सरकारवर ‘वॉच’ ठेवणार आहोत. त्यांना स्वस्थ बसू देणार नाही. अधिकाऱ्यांनी किंवा सरकारने कुठेही काही गडबड करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सोडणार नाही,’ असा इशारा ‘प्रहार’चे प्रमुख बच्चू कडू यांनी शुक्रवारी सरकारला दिला.