Nagpur News: नापिकी, कर्ज आणि आर्थिक ताण; नरखेड तालुक्यात शेतकऱ्याने जीवन संपवले
Nagpur Farmer: नापिकी, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक अडचणींमुळे नरखेड तालुक्यातील एका शेतकऱ्याने शेतातील गोठ्यात गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतकरी संकट पुन्हा एकदा समोर आले आहे.
अंबाडा : नापिकी, शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने तसेच आर्थिक अडचणींमुळे नरखेड तालुक्यातील सिंदी (उमरी) येथील शेतकरी दुर्गादास नारायणराव बोंदरे (वय ४८) यांनी शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.