Nagpur News: कर्जमाफीची घोषणा, पण शेतकरी अजूनही प्रतीक्षेत!; शेती हंगाम सुरू, पण शेतकऱ्यांच्या खिशात पैसे नाहीत

Government Policies and Agricultural Crisis: शेतकरी कर्जमाफी आणि शेती हंगामावर सरकारच्या धोरणांचा परिणाम. कर्जमाफी योजना, शेतकरी कर्ज, आर्थिक संकट यावर सविस्तर माहिती.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची नेहमीच नाचक्की झाली आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांंना त्याचा लाभ कधी मिळेल हे सांगता येत नाही. काही दिवसांत शेती हंगाम सुरू होईल. शेतकरी शेतीची मशागत करतील. त्यानंतर पेरणीसाठी आवश्यक साहित्य आणि पैशाची जुळवाजुळव करेल. प्रत्येक वर्षीचा शेतकऱ्यांचा नित्यक्रम. मात्र, यंदा शेतकऱ्यांचे शेतीचे आर्थिक गणित कोलमडणार असल्याचे दिसून येते. सरकारचे धोरण आणि शेतकऱ्यांचे मरण एकाच वेळेस येत असल्याने शेतकऱ्यांची मोठी गळचेपी होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com