

Yavatmal Land Dispute Turns Fatal: Farmer Killed After Repeated Threats
Sakal
यवतमाळ : शेतजमिनीच्या जुन्या वादातून एका शेतकऱ्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाल्याची घटना वडगाव जंगल पोलिस ठाण्यात अंतर्गत मंगळवारी (ता. १३) बेलोरी येथे उघडकीस आली. दरम्यान, वडगाव जंगल पोलिसांनी मारेकऱ्याला ताब्यात घेतले. श्रीराम लक्ष्मण सुरपाम (वय ५०), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तर संभा धर्माजी गाडेकर (वय ४८, रा. बेलोरी), असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.