
-मनोहर बेले
अंबाडा (ता. नरखेड, जि. नागपूर) : सध्या दडी मारून बसलेला पाऊस काहीच दिवसांत पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. पाऊस सुरू होताच शेतकऱ्यांची शेतीच्या कामाची लगबग सुरू होणार आहे. शेतकऱ्यांनी बियाण्यांची खरेदी करताना कंपनीचे प्रतिनिधी किंवा विक्रेते यांच्यावर आंधळा विश्वास ठेवून, कंपन्यांच्या जाहिराती वाचूनही बियाणे खरेदी करू नये. एवढेच नाही तर खरेदीची पक्की पावती घ्यावी. बियाणे खराब निघाले तर संपूर्ण हंगाम वाया जाण्याची भीती असते. त्यामुळे बियाणे खरेदी करताना सावध राहा, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले.