आम्हाला नुकसान भरपाई मिळणार तरी कधी? एक वर्षापासून नुकसान भरपाईचे अहवाल धूळ खात

farmers are seeking for loss benefits in Nagpur district
farmers are seeking for loss benefits in Nagpur district

धानला(जि. नागपूर)  :  रब्बी हंगामात गहू आणि चणा हे नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकारी घेत असतात. मात्र मागील वर्षी पडलेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे पिकांवर आलेल्या किडी रोगांचे योग्य ते उपाय करता आले नाही त्यामुळे मौदा तालुक्यातील चणा व गहू हे पीक पूर्णतः भुईसपाट झालेले आहे. पंचनामे करून सरकारकडे नुकसान भरपाई मिळण्यात यावे याकरिता तहसील कार्यालयाकडून सादर करण्यात आलेले प्रस्ताव मात्र एक वर्षांपासून धूळ खातच पडले आहेत.

गहू व चणा हे पीक सततच्या अवकाळी पावसामुळे पिकांवर आलेल्या किडी रोगांचे योग्य ते उपाय करता आले नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातून निघून गेले. शेतकरी खरीप पिकांच्या माध्यमातून मिळणारे उत्पादन हे आपले सर्व कर्ज व व्यवहार करण्यात खर्च करत असतो तर रब्बी पिकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पादनातून ते पुढील भविषयांची बचत व येणाऱ्या पुढील हंगामातील पिकांची लागत म्हणून या रब्बी हंगामावरील उत्पादनांवर अवलंबून असतात.

यातच मौदा तालुक्यात चणा हे पीक ६१८७ शेतकऱ्यांनी तर गहू हे पीक २९५८० शेतकऱ्यांनी घेतले होते. त्यात चणा हे पीक ५६९३.७५ हे. आर क्षेत्रात तर गहू हे पीक १७२५९.४० हे. आर नुकसान ग्रस्त क्षेत्र आहे. १० जून २०२० ला तहसील कार्यालयाकडून शासनाला चणा या पिका करिता  गहू पिकाकरिता नुकसान भरपाई मिळण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे. परंतु त्याबाबत अजूनही शासनाकडून कोणत्याही प्रकारचे योग्य ती कार्यवाही करण्यात आलेली नाही. सर्व शेतकऱ्यांच्या नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आलेत. मात्र कोणतीही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली. तर मग शासन पंचनामे का करतो? तसेच शासनाच्या खोट्या अस्वासनावर किती दिवस जगायचे अशा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

चालू वर्ष सुद्धा शेतकऱ्यांना नुकसानीचाच निघाला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन हे पीक सततच्या अवकाळी पावसामुळे पिकांवर आलेल्या किडी रोगांचे योग्य ते उपाय करता आले नाही. तर धान हे पीक सततच्या अवकाळी पावसामुळे तसेच पिकांवर आलेल्या खोडकिडा आणि तुडतुडे या किड रोगांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. तालुक्यातील काही भागात आलेल्या महापूरमुळे सुद्धा काही भागातील शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे. यामुळे संपूर्ण शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता पुढे शेती करायची की नाही? पुढील जीवन जगायचे कसे? मुलांचे पुढील शिक्षण करावे कसे इत्यादि प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसले आहेत.

मागील वर्षीचे रब्बी हंगामात झालेली शेतपिकांची मोठ्या प्रमाणातील नुकसान व या वर्षी सुद्धा झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीमुळे पुढील शेती करणे बिकट हॉट चालले आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी.
सूर्यकांत ढोबळे, 
नुकसान ग्रस्त पिकांचे शेतकरी

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com