शेतकऱ्यांची आर्थिक व्यथा : साहेब, धानाचा बोनस कधी देता?

शेतकऱ्यांची आर्थिक व्यथा : साहेब, धानाचा बोनस कधी देता?

धानला (जि. नागपूर) : राज्य शासनाने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्यावतीने शासन निर्णयाच्या माध्यमातून २१ डिसेंबर २०२० ला प्रति शेतकरी (Farmers) ५० क्विंटलची मर्यादा पाळून धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस मंजूर करण्यात आला. आधारभूत किंमत (Base price) १,८६८ रुपये आणि त्यावर ७०० रुपये बोनस याप्रमाणे २,५६८ रुपये धानाला दर मिळत आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना धानाची किंमत तर मिळाली, मात्र तीन ते चार महिने होऊनही राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेला बोनस मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. (Farmers do not get grain bonus even after the end of the year)

मौदा तालुकत्यातील शेतकऱ्यांची बोनसची एकूण रक्कम १७०,२२४, ६०० रुपयांच्या घरात आहे. आता ही रक्‍कम शेतकऱ्यांना केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा लागली आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची असून शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दरात धान विकावे लागू नये, म्हणून ही योजना राबविण्यात येते. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा लाभ मिळावा, या हेतूने राज्य शासनाने नियुक्त केलेल्या अभिकर्ता संस्थेमार्फत धान खरेदी केली जाते.

शेतकऱ्यांची आर्थिक व्यथा : साहेब, धानाचा बोनस कधी देता?
वडिलांच्या भेटीसाठी मुलाने दुचाकीने केला ६७० किलोमीटरचा प्रवास

तालुक्यात असे एकूण आठ खरेदी केंद्र आहेत. या आठही खरेदी केंद्रावर आतापर्यंत जवळपास एकूण २ लाख ४३ हजार १७८ क्विंटल एवढी धान खरेदी केली आहे. याकरिता वर्ष २०२०-२१ करिता किमान आधारभूत किंमत साधारण दर्जाच्या धानाकरिता १८६८ रुपये, तर ‘अ’ दर्जाच्या धानाकरिता १८८८ रुपये दर निश्चित करण्यात आले आहे.

यावर्षी एक एकर धान पीक शेतीकरिता खर्च जवळपास ५७ हजार ४०० रुपये आला आहे. मात्र उत्पन्न हे फक्त ९ ते ११ क्विंटल जे सामान्य उत्पन्न हे साधारणतः २० ते २३ क्विंटलच्या आत असते. रोवणी झालेल्या धानावर वातावरणाचा परिणाम झाला असून यावर्षी सततच्या पावसामुळे रोगांवर योग्य ती फावरणी व निदान करता आले नाही. खोडकिडा आणि तुडतुडे या रोगांमुळे उत्पन्न हे दरवर्षीपेक्षा अर्ध्याहूनही कमीच राहिले. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

जिथे शेतकऱ्यांरी फक्त १ किंवा दोनदा रासायनिक फवारणी करायचे तिथे यावर्षी खोडकिडा आणि तुडतुडे या रोगांमुळे ४ ते ५ वेळा फावरणी करावी लागली. खरीप हंगामातील धानपीक अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने धुमाकाळ घातला. बऱ्याच शेतकऱ्यांच्या धानाच्या कापणी झालेल्या कडपा ओल्या झाल्यात तर काहींचे उभे असलेले पीक हे खालील लोटून गेल्याने पाण्यामुळेही सडून गेले. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे.

शेतकऱ्यांची आर्थिक व्यथा : साहेब, धानाचा बोनस कधी देता?
धक्कादायक माहिती : दिवसाला सरासरी २५ चिमुकले कोरोनाबाधित

मागील वर्षीसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आले होते. तीच परिस्थिती यंदासुद्धा निर्माण झाली आहे. दुसरीकडे निविष्ठांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. खरीप हंगामाकरिता काहीच दिवसात शेतीच्या कामाला सुरुवात होईल. शासनाने याकडे गंभीर्याने लक्ष केंद्रित करणे गरजेच आहे.

‘सकाळ’मधून पाठपुरावा

मागील वर्षी राज्य शासनाच्यावतीने बोनस म्हणून ५०० रुपये प्रति क्विंटल जाहीर करण्यात आले होते. मात्र महादुला येथील धान खरेदी केंद्र येथे मागील वर्षी धान विकलेल्या काही शेतकऱ्यांना अद्यापही बोनसचा लाभ मिळालेला नाही. व्यवस्थापकाच्या तांत्रिक चुकीमुळे शासनाला अपुरी माहिती पाठवल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे. याबाबत ‘सकाळ’ ने २१ डिसेंबरला ‘बोनस मिळवण्याकरिता करावा लागतो सामना' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.

(Farmers do not get grain bonus even after the end of the year)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com