Nagpur: निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिला धीर
Chandrashekhar Bawankule: सप्टेंबर अखेरपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे गेल्या पन्नास वर्षांतील विक्रमी नुकसान झाले आहे. पंचनाम्याद्वारे आणि ड्रोनच्या साहाय्याने शेतकऱ्यांना मदत पोहोचवली जाणार असल्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
नागपूर : गत पन्नास वर्षात शेतकऱ्यांचे पावसामुळे जेवढे नुकसान झाले नसेल, तेवढे नुकसान राज्यात सप्टेंबर अखेरपर्यंत झालेल्या पावसाने झाले आहे. राज्याच्या प्रत्येक भागात शासन शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करीत आहे.