Nagpur Accident : दुचाकीने कट मारला... वडिलांचा मृत्यू, मुलगा जखमी! नागपूर येथील घटना
Hit And Run : नागपूरच्या सीताबर्डी भागात अज्ञात वाहनाने कट दिल्याने दुचाकीवरील ४३ वर्षीय फारूख शहा यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगाही अपघातात जखमी झाला आहे.
नागपूर : सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मुलासह मोटारसायकलवरून जाणाऱ्या ४३ वर्षीय इसम दुचाकीने कट मारल्याने खाली पडून जखमी होऊन ठार झाला. ही घटना १७ मे रोजी सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास घडली.