

चिखली : चिखली- जाफराबाद रोडवर स्थित भोकारवाडी जवळ भरधाव दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडावर आदळली. यात दुचाकीस्वार दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला; तर एका तरुणाला रुग्णालयात दाखल करताना त्याचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (ता. २५) दुपारी १२ वाजेच्या सुमारास झाला.