
नागपूर : महागाई सर्वसामान्यांची पाठ काही सोडत नाही. काही महिन्यांपासून टोमॅटो व इतर भाज्यांच्या दरात सतत वाढ होत असताना ऐन सणासुदीत तूरडाळ, कडधान्य, खाद्य तेल आणि साखर महागली आहे. सणासुदीच्या तोंडावर हरभरा डाळीचा दरही वाढला आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.