Nagpur: नागपूर काँग्रेसच्या बैठकीत विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्या समोरच कार्यकर्त्यांचा तुफान राडा!

In front of Nana Patole, workers stormed...
congress party
congress partyesakal

Nagpur : काँग्रेसची बैठक नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीत माईकवर बोलण्यावरून चांगलाच वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी वादाचे रूपांतर राड्यात झाले.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

नागपूर शहर काँग्रेसची महत्त्वाची बैठक आज आयोजित करण्यात आली होती.या ठिकाणी महत्वाचा आढावा घेण्यात येणार होता. नागपूरच्या सहा मतदार संघांचा आढावा या ठिकणी घेतला जाणार होता. पण भाषण करण्यावरून दोन नेत्यांमध्ये वाद झाल्याने हा सगळा गोंधळ पाहायला मिळाला.

congress party
Mumbai News : घाटकोपरमध्ये गुजराती पाटयांचा वाद चिघळला

नुकतंच विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधी यांच्या विषयी एक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी बैठकीवेळी निषेध केला. आणि तुम्ही इथे आलात कसे? असा जाब विचारला. तर दुसरीकडे प्रदेशातील एका नेत्याने यावेळी सावरासराव करायचा प्रयत्न केला. यानंतर या वादाचे रूपांतर राड्यात झाले.

यावेळी कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर नेत्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली मात्र यावेळी धक्काबुक्कीचे प्रकार घडत असल्याचे पहायला मिळाले.

congress party
Mumbai News : दापोली रिसॉर्ट प्रकरण; सदानंद कदम यांचा सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com