वित्तीय सल्लागार तरुणी अपघातात ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Financial adviser killed in accident nagpur

वित्तीय सल्लागार तरुणी अपघातात ठार

नागपूर : मंगळवारी(ता.५) वाडी परिसरात वकील महिलेचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, मंगळवारी मध्यरात्री पाऊन वाजताच्या सुमारास गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोरेवाडा परिसरात ॲक्टिव्हावरुन जाणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचा ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. ती बॅंकेत फायनान्स करुन देण्याचे काम करीत होती. प्रिया कैलास गजभिये (रा. वेलकम सोसा. झिंगाबाई टाकळी) असे तरुणीचे नाव आहे. ती बॅकमधून लोन फायनान्स करुन देण्याचे काम करीत होती.

काल मध्यरात्रीच्या सुमारास ती अॅक्टिवाने (एमएच - ४९/ए.एक्स - ०८१०) अवस्थीनगर चौकाकडून झिंगाबाई टाकळीकडे जात होती. अचानक मागून येणाऱ्या ट्रकने तिला धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. प्रिया गजभिये हिचा श्रीवास्तव नावाच्या तरुणाशी प्रेमविवाह झाला होता. मात्र, नवऱ्याशी पटत नसल्याने तिने त्याच्यापासून विभक्त होण्यासाठी न्यायालयात घटस्फोटचे प्रकरण दाखल केले होते. त्यामुळे ती झिंगाबाई टाकळी येथे आईसोबत वास्तव्यास होती. काल रात्री आपली कामे आटोपून ती अवस्थीनगर चौकाकडून झिंगाबाई टाकळी येथील घराकडे जात होती. मात्र, गोरेवाड्याजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, यामागे कोणता घातपात तर नाही, याचाही पोलिस शोध घेत आहेत.

Web Title: Financial Adviser Killed In Accident Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..