esakal | कोरोनामुळे ग्रामीण अर्थकारण डगमगले; शेतकरी, लहान व्यवसायिक आणि सुशिक्षित तरुणाईची वाढली चिंता 

बोलून बातमी शोधा

व्यवहार ठप्प पडल्याने देशभरात अर्थव्यवस्था कोलमडली होती. यामुळे कामगार शेतकरी, शेतमजूर, लहान व्यवसायिक व सुशिक्षित तरुणांना चांगलीच झळ बसली होती. यात ग्रामीण अर्थचक्र डगमगले. 

व्यवहार ठप्प पडल्याने देशभरात अर्थव्यवस्था कोलमडली होती. यामुळे कामगार शेतकरी, शेतमजूर, लहान व्यवसायिक व सुशिक्षित तरुणांना चांगलीच झळ बसली होती. यात ग्रामीण अर्थचक्र डगमगले. 

कोरोनामुळे ग्रामीण अर्थकारण डगमगले; शेतकरी, लहान व्यवसायिक आणि सुशिक्षित तरुणाईची वाढली चिंता 
sakal_logo
By
मनोहर घोळसे

सावनेर (जि. नागपूर) :  संपूर्ण जगालाच डबघाईस आणलेल्या कोरोनाच्या संसर्गाने देशात व राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे गेल्या मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर संपूर्ण व्यवहार ठप्प पडल्याने देशभरात अर्थव्यवस्था कोलमडली होती. यामुळे कामगार शेतकरी, शेतमजूर, लहान व्यवसायिक व सुशिक्षित तरुणांना चांगलीच झळ बसली होती. यात ग्रामीण अर्थचक्र डगमगले. 

कालांतराने कोरोना संसर्गापासून दिलासा मिळताच हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत झालेत. परंतु कोरोना बाबतच्या मार्गदर्शन तत्वांकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढला तरीही बेजबाबदार लोकांचा मुक्तसंचार सुरूच असल्याने राज्य सरकारने नियंणासाठी निर्बंध कडक केलेत. 

शेतकरी, लहान व्यवसायिक व शहरी भागात जाऊन कामात वळती झालेली तरुणाई परत गावाकडे वळली. अवघ्या काही दिवसातच पुन्हा नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ग्रामीणचे अर्थकारण डगमगले असून आता लॉकडाउन नको, असे सूर उमटत आहेत. 

शहरापुर्ते मर्यादित असलेले कोरोना विषाणूचे संक्रमण ग्रामीण भागात झपाट्याने पसरले आहे. यातच रुग्णसंख्या व मृत्यूदरात होणारी वाढ बघून नियंत्रणासाठी शासन व प्रशासकीय यंत्रणेपुढे मोठे आवाहन ठाकले आहे. अशा वेळी कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी राज्य सरकारने निर्बंध जाहीर केले ते पाळण्यात सर्व घटकांनी साथ द्यायला हवी. 
-सोनू रावसाहेब, 
सरपंच जटामखोरा 

कोरोनाकाळात उद्भवलेल्या लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे अनेक तरुणांच्या हातातील रोजगार हिरावला मोठ्या शहरात रोजगारासाठी स्थलांतरित झालेले अनेक कुशल, अकुशल कामगार गावाकडे परतले. त्यांच्या हाताला काम नाही. सततच्या नापिकीमुळे अगोदरच शेतकरी अडचणीत आहेत. बाजारपेठ मंदावल्याने व्यापाऱ्यांनाही झळ पोहचली आहे. 
-मनोज बसवार 
सामाजिक कार्यकर्ते 

संपादन - अथर्व महांकाळ