esakal | कोरोना चाचणी टाळून प्रवाशांची पळवापळवी, नागपूर स्टेशनवरील प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Test

कोरोना चाचणी टाळून प्रवाशांची पळवापळवी, नागपूर स्टेशनवरील प्रकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणीचा (corona testing) निगेटिव्ह अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. तो नसल्यास वेळेवर तपासणी केली जात आहे. परंतु, ऑटोचालकांकडून ही संपूर्ण प्रक्रियाच बायपास करून रेल्वे प्रवाशांची खुष्कीच्या मार्गाने पळवापळवी करण्यात येत होती. रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) (Railway police force) पथकाने या धोकादायक उपद्‍व्यापाचा पर्दाफाश करीत पाच ऑटोचालकांना ताब्यात घेतले. (fir filed against five autorikshaw driver to escape travler from corona testing)

हेही वाचा: औषधांसह सकारात्मकताच गुणकारी; बेदरकर कुटुंबाची कोरोनावर मात

अनेक भागात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याची चिन्हे असली तरी अजूनही बऱ्याच राज्यांमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. त्यात तिसऱ्या लाटेचीही भीती कायम आहे. यापार्श्वभूमिवर परराज्यातून येणारे विशेषतः कोरोनाच्या दृष्टीने अति संवेदनशील असणाऱ्या राज्यातून रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. अहवाल नसल्यास नागपूर स्टेशनवरच आरटीपीसीआर तपासणी केली जाते. त्यासाठी फलाट क्रमांक १ वरील जनरल प्रतीक्षालय भागात व्यवस्था करण्यात आली आहे. पण, या प्रक्रियेत वेळ जातो. शिवाय पॉझिटिव्ह आल्यास क्वॉरंटाईन रहावे लागण्याची भीती असते. यामुळे बरेच प्रवासी चाचणी करून घेण्यास इच्छुक नसतात. काही ऑटोचालकांनी ही बाब हेरली. अधिक मिळकतीसाठी तपासणीशीवाय प्रवाशांना बाहेर काढण्याची शक्कल लढवली. ते प्रवासी मिळविण्यासाठी आरएमएस इमारतीतून आत शिरायचे. चाचणीशिवाय थेट बाहेर काढून देण्यासाठी पैशांची मागणी करायचे. प्रवासी तयार होताच आरएमएस इमारतीतून त्यांना बाहेर घेऊन जात होते. पैशांसाठी ऑटोचालक स्वतःचा जीव धोक्यात घालत होते. पण, या प्रकाराने कोरोनाचा आटोक्यात आलेला संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता होती. सुमारे तीन दिवस हा प्रकार चालला. सुगावा लागताच आरपीएफच्या पथकाने ५ ऑटोचालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top