esakal | प्रेयसीची सोशल मीडियावरून बदनामी, प्रियकराविरूद्ध गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

fir

प्रेयसीची सोशल मीडियावरून बदनामी, प्रियकराविरूद्ध गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आईने मुलीला प्रियकरासोबत मोबाईलवर बोलताना पकडले. त्यानंतर प्रियकराला दम देत प्रेमसंबंध तोडण्यास भाग पाडले. प्रियकराने प्रेयसीच्या आईचा वचपा काढण्यासाठी चक्क फेसबुकवर प्रेयसीबाबत अश्‍लील लिखाण करीत बदनामी केली. याप्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी (sadar police station nagpur) गुन्हा दाखल केला. रोहित ठाकूर (२०, व्यंकटेशनगर, नंदनवन) असे आरोपीचे नाव आहे. (FIR filed against man for posting offensive content about girlfriend on social media)

हेही वाचा: 'पंकजा मुंडे पुढच्याही जन्मी भाजपच्याच सदस्य'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित ठाकूर हा पदवीचा विद्यार्थी आहे. त्याची जानेवारी २०१९ ला त्याची १७ वर्षीय मुलगी रिया (काल्पनिक नाव) हिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिने एक्सेप्ट केल्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले. अकरावीचे शिक्षण घेत असलेली रिया रोहितच्या प्रेमात पडली. दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले आणि संपर्क सुरू झाला. दोघांच्या भेटी व्हायला लागल्या. गेल्या काही दिवसांपूर्वी रिया आईला फोनवर दबक्या आवाजात बोलताना दिसली. तिला पकडल्यानंतर चौकशी केली. तिने प्रियकर असल्याचे सांगितले. आईने तिच्या वडीलांना माहिती दिली. कुटुंबीयांनी तिची समजूत घातली. त्यानंतर रोहितला कॉल करून बोलावले. त्याला रियाशी न बोलण्याची आणि प्रेमसंबंध न ठेवण्याची तंबी दिली. त्यामुळे रोहित चिडला. त्याने फेसबुकवर रियाबाबत घाणरेडे कमेंट्स लिहिले तसेच काही फोटोही अपलोड केले. ही बाब रियाला कळली. तिने आईला सांगितले. आईने सदर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

loading image