esakal | महिला जवानाशी पर्यवेक्षकाचे अश्लील चाळे, शरीर सुखाची केली मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

महिला जवानाशी पर्यवेक्षकाचे अश्लील चाळे, शरीर सुखाची केली मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात (मेयो) (IGGMC) सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला जवानाशी एका पर्यवेक्षकाने अश्‍लील चाळे करीत शारीरिक सुखाची मागणी (nagpur crime) केली. या प्रकरणी तक्रारीवरून पर्यवेक्षकाविरुद्ध तहसील पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. राजू विठ्ठल पाटील (वय ४५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पर्यवेक्षकाचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

हेही वाचा: खासदार तडस यांच्या कौटुंबिक वादात मोठा ट्विस्ट, मुलगा-सुनेचं वैदीक पद्धतीनं लग्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २८ वर्षीय महिला महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळात कार्यरत आहे. ती मेयो रुग्णालयात सुरक्षेसाठी तैनात आहे. राजू हा तिचा सिनिअर असून तिला नेहमी त्रास द्यायचा. तिची छेडखानी करून काढून शरीर सुखाची मागणी करायचा. गेल्या काही दिवसांपासून ड्युटीवर आल्यानंतर तिच्याशी अश्‍लील चाळे करीत होता. त्यामुळे ती जवान त्रस्त झाली होती. त्यामुळे तिने तहसील पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून राजू याला अटक केली. हे प्रकरण दडपण्यासाठी मेयोतील एका डॉक्टरने पोलिसांवर दबाव आणला होता, असेही कळते. सहा महिन्यांपूर्वीही राजूविरुद्ध पीडित महिलेने तक्रार केली होती. यावेळी त्याची बदली करण्यात आली. मात्र, त्याला नागपुरातून सोडण्यात आले नाही, अशीही माहिती आहे.

loading image
go to top