esakal | युवासेनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल, पैशासाठी कोंडून जीवे मारण्याची धमकी
sakal

बोलून बातमी शोधा

yuvasena

युवासेनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल, पैशासाठी कोंडून जीवे मारण्याची धमकी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कंत्राटदाराला पैशासाठी धमकावणाऱ्या युवासेनेचे (yuvasena nagpur) नागपूर जिल्हा प्रमुख हितेश यादव याच्यासह तिघाजणांवर हुडेकेश्वर पोलिस ठाण्यात (hudkeshwar police station nagpur) गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे युवासेनेत चांगलीच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: शिवसेना संपर्क प्रमुखांचे पंख छाटले; घ्यावी लागणार चौघांची संमती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अभय विजय भांडारकर (२६, म्हाडा सीटी, गणेशपेठ) हे कंत्राटदार आहेत. त्यांनी अमरावती जिल्ह्यातील कुसला येथे पंढरी प्रोजेक्ट नावाच्या धरणावर प्रोजेक्ट कंस्ट्रक्शनचे काम एफ.ए. कंस्ट्रक्शन कंपनीकडून घेतले आहे. त्या कामासाठी कृष्णराव चंद्रशेखर एलामपुली ट्रक आणि पोकलेंड मशिन भाड्याने घेतल्या होत्या. कृष्णराव यांचे जवळपास २८ लाख रुपये भाडे झाले होते. त्यापैकी भांडारकरने १५ लाख रुपये कृष्णा यांना दिले. त्यापैकी १२ लाख रुपये देणे बाकी होते. ते पैसे कंपनीकडून मिळाल्यानंतर कृष्णराव यांना देण्याचे ठरले होते. परंतु कृष्णराव हे वारंवार पैशाची मागणी करीत होते. १६ ऑगस्ट २०२१ला अभय हे चंद्रपूरला असताना युवासेनेचा जिल्हाप्रमुख आरोपी हितेश यादव याचा फोन आला. कृष्णराव यांचे पैसे लवकर दे नाहीतर तुझा गेम करतो, अशी धमकी दिली. त्यानंतर अभय मित्र योगेश्‍वर संगितराव यांच्यासोबत हितेश यादवला भेटायला बजाजनगर चौकात भेटायला गेले. चर्चा झाल्यानंतर दारूच्या नशेत असलेल्या हितेश यादव याने कारने घरी सोडून मागितले. त्यानंतर हितेशने आउटर रिंगरोडवरील साई ढाब्यावर गाडी घेण्यास सांगितले. तेथे हितेशने ‘तू कृष्णरावचे पैसे दे..अन्यथा तुझ्या घरी गुंडे पाठवून मर्डर करतो.’ असे म्हटले. त्यानंतर अभय आणि त्याच्या मित्राला दोन तास बेकायदेशिररित्या कोंडून ठेवले. त्यानंतर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी हितेश यादव, कृष्णराव येलापल्ली आणि आणखी एका साथिदाराविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

loading image
go to top