esakal | सावधान! पोलिसांना fake call केल्यास होणार गुन्हे दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

fake call

सावधान! पोलिसांना fake call केल्यास होणार गुन्हे दाखल

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : ‘हॅलो..पोलिस कंट्रोल रूम (police control room)...मी एक्सवायझेड बोलतोय...शहरातील अमुक ठिकाणी खून झाला आहे...काही युवक तलवार-चाकू घेऊन उभे आहेत...’ असा कॉल करतात... घटनेचे गांभीर्य ओळखून कंट्रोल रूममधून संबंधित पोलिस स्टेशनला वायरलेसवर संदेश जातो...पोलिसांची धावपळ होते...घटनास्थळावर गेल्यावर मात्र, फेक कॉल (fake call) असल्यामुळे पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागते....एका फेक कॉलमुळे सर्वकाही विस्कळित होते. मात्र, आता फेक कॉल करणाऱ्यांची गय केल्या जाणार नाही. आता तशा लोकांवर थेट गुन्हे दाखल करून खटला भरला जाणार आहे. (fir will file if police receive fake call in nagpur)

हेही वाचा: लेखी आश्वासनानंतरचं अविनाशवर अंत्यसंस्कार; रेस्क्यू टीम दाखल

शहर पोलिस नियंत्रण कक्षाला गेल्या काही दिवसांपासून १०० डायलवर फेक कॉल येत आहेत. त्यामळे पोलिस त्रस्त आहेत. अनेकदा केवळ गंमत म्हणून पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल लावण्यात येतो. घटना घडल्याची खोटी माहिती देण्यात येते. पोलिस तातडीने घटनास्थळावर जातात, तेव्हा तेथे शांतता असते. फोन करणारा व्यक्तीही हजर नसतो. पोलिसांना केवळ त्रस्त करण्यासाठी काही जण कॉल करीत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता फेक कॉल करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. फेक कॉल करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली असून आता पोलिस थेट गुन्हे दाखल करणार आहेत. जेणेकरून पोलिसांची कुणीही टिंगलटवाळी करण्याची हिम्मत करणार नाही.

यापूर्वीही केले होते गुन्हे दाखल -

गेल्या दोन वर्षांपूर्वी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन लावून महिला कर्मचाऱ्यांशी उद्धट भाषा वापणाऱ्यांचे कॉल वाढले होते. त्यामुळे तत्कालीन पोलिस आयुक्त के. वेंकटेशम् यांनीही आक्रमक भूमिका घेत थेट गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे पोलिसांचा वचक निर्माण झाला होता. तेव्हापासून तसे कॉल बंद झाले होते.

पोलिस कंट्रोल रूमला फेक कॉल करून त्रस्त करणाऱ्यांची माहिती घेणे सुरू आहे. फेक कॉल केल्यामुळे संपूर्ण पोलिस यंत्रणा कामाला लागते. परंतु हाती काहीच लागत नाही. त्यामुळे पोलिसांचा वेळ वाया जातो. त्यामुळे फेक कॉल करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आता थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, नागपूर शहर
loading image