
नागपूर: रतलाम वरून पेट्रोल-डिझेल भरून मालगाडी तडाली येथे जाणारी होती. दुपारी ३.४५ वाजताच्या फलाट क्रमांक १ आणि २ च्या मधात मेनलाईन ही मालगाडी आली. अचानक एका वॅगनमधून आगीच्या भडका उडाला. पाहता-पाहता आग फलाटच्या शेड पर्यंत पोहोचली. बाजूला तेलंगणा एक्स्प्रेस फलाट क्रमांक १ वर उभी होती. तेथील प्रवासी भयभीत झाले. काहींना ही आग आपल्या गाडीला लागल्याचा भास झाला. त्यामुळे प्रवासी गाडीखाली उतरू लागले. तर फलाटावर उभे असलेले प्रवासी सुद्धा आगीचे रौद्ररूप पाहून पळत सुटले. गाडीचे प्रवासी आणि फलाटावरील प्रवासी एकाच वेळी पळाल्याने धावपळ माजली.