esakal | नागपुरात डेकोरेशनच्या गोदामाला भीषण आग; साहित्य जाळून खाक तर एक घोडाही जखमी 
sakal

बोलून बातमी शोधा

fire at decoration Godown in Nagpur

आज अशीच एक आगीची घटना नागपुरातून समोर येतेय. 

नागपुरात डेकोरेशनच्या गोदामाला भीषण आग; साहित्य जाळून खाक तर एक घोडाही जखमी 

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : राज्यात विचिध जिल्ह्यांमध्ये निरनिराळ्या ठिकाणी आगीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील  मॉलमधील कोविड सेंटरला लागलेली आग असो की पुण्याच्या फॅशन स्ट्रीटला लागलेली आग यामुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यातच आज अशीच एक आगीची घटना नागपुरातून समोर येतेय. 

धक्कादायक! ग्रामीण भागात अक्षरशः फेकण्यात येतेय कोरोना प्रतिबंधक लस? 

नागपूरच्या श्रीकृष्ण नगरातील आदर्श संस्कार शाळेजवळ असलेल्या डेकोरेशनच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत गोदामातील मंडप डेकोरेशनचं संपूर्ण साहित्य जळून खाक झालंय. आज सकाळी सडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. 

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. शर्थीचे प्रयत्न करून काही वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. मात्र तोपर्यंत संपूर्ण साहित्य जळून खाक झालं होतं.  

धक्कादायक! नागपूर महापालिकेकडून ‘हॉटस्पॉट' परिसर लपवण्याचा प्रयत्न; रुग्ण वाढण्याची भीती

३ घोडेही होते गोदामात 

गोदामाला आग लागली त्यावेळी गोदामात तीन घोडे बांधलेले होते. त्यासाठी गोदमाची भिंत तोडून त्यांना बाहेर काढण्यात आले. यात एक घोडा जखमी झाल्याची माहिती मिळतेय. सुदैवानं या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image