esakal | अंतर्गत मूल्यमापनाचा फायदा : १९ हजारांनी वाढले प्रथम श्रेणीतील विद्यार्थी
sakal

बोलून बातमी शोधा

अंतर्गत मूल्यमापनाचा फायदा : प्रथम श्रेणीतील विद्यार्थी वाढले

अंतर्गत मूल्यमापनाचा फायदा : प्रथम श्रेणीतील विद्यार्थी वाढले

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : दहावीच्या निकालाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. यावर्षी अंतर्गत मूल्यमापनावरून निकाल तयार करण्यात आला. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना चांगलाच झाल्याचे दिसून आले. गेल्यावर्षीच्या तुलनेच प्रथम श्रेणी मिळविणारे विद्यार्थ्यांमध्ये १९ हजार ३०९ ने वाढ झाली आहे. मात्र, द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. (First-class-students-increased-by-19,000-nad86)

राज्य मंडळाचा निकालाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. यामध्ये विभागातून नियमित आणि फेरपरीक्षार्थी असे एकूण १ लाख ६२ हजार १६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ६१ हजार ९६ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यामध्ये ४८ हजार ४२६ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी मिळविली. याशिवाय ७७ हजार ५४६ विद्यार्थी प्रथम आणि २९ हजार ६३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेत.

हेही वाचा: बोंबला! निकालाचे संकेतस्थळच ‘क्रॅश’; विद्यार्थ्यांची धावपळ

मात्र, गेल्यावर्षीची टक्केवारी बघीतल्यास प्रावीण्य श्रेणीत ४१ हजार २४६ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ५८ हजार २३७ तर द्वितीय श्रेणीत ४१ हजार १५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी केवळ एकाच विषयाचा पेपर बोर्डाला घेता आला नाही. मात्र, यावर्षी परीक्षाच रद्द करण्यात आल्याने अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर निकाल ९९.८४ टक्के लागला. त्यात गेल्यावर्षीत्या तुलनेत प्राविण्य आणि प्रथम श्रेणीत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले. याउलट द्वितीय आणि केवळ पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचे दिसून आले.

  • श्रेणी २०२० २०२१

  • प्रावीण्य श्रेणी ४१,२४६ ४८,४२६

  • प्रथम श्रेणी ५८,२३७ ७७,५४६

  • द्वितीय श्रेणी ४१,१५९ २९,०६३

  • पास १०,८०२ ६,०६१

(First-class-students-increased-by-19,000-nad86)

loading image