लठ्ठपणावर महिन्याला ५ शस्त्रक्रिया, १९१ किलोची व्यक्ती आता ९२ किलो

surgery
surgery e sakal

नागपूर : कोरोना विषाणूच्या (coronavirus) धास्तीने गेले दिड वर्ष जनजीवनावर निर्बंध आले आहेत. शासकीय कार्यालयांपासून तर खासगी कार्यालयांसह कार्पोरेट कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुक्त वावरावरही निर्बंध लादले. सरकारी कार्यालये वगळता बहुसंख्य मनुष्यबळ असलेल्या खासगी संस्थांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’चे (work from home) कल्चर सुरू झाले. मात्र, वर्क फ्रॉम होम स्थूलपणासह लठ्ठपणा वाढीस कारणीभूत ठरत असल्याचे वास्तव पुढे आले. मेडिकलमध्ये महिन्यात दोन लठ्ठपणावर शस्त्रक्रिया (bariatric surgery) व्हायच्या आता पाच शस्त्रक्रिया होत आहेत. (five bariatric surgery to reduce weight done in month in gmc nagpur)

surgery
...तर नागपूरचा होणार कोकण! 'या' आहेत धोकादायक वस्त्या

कोरोना विषाणू संक्रमणाच्या भीतीने मोठमोठ्या कार्पोरेट कंपन्यांनी मनुष्यबळाला घरातूनच काम करावे असे निर्देश दिले. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत घरात राहून बैठे काम वाढले. एकाच जागी बसून तासन तास काम अन् एकाच ठिकाणी टीव्हीसमोर बसून ऑर्डर केलेले जंक फूड यामुळे पूर्वीच्या तुलनेत लठ्ठपणाचे प्रमाण वाढले. याशिवाय व्यायामाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे लठ्ठपणाच्या प्रमाणात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती मेडिकलच्या सर्जरी विभागाचे प्रमूख तसेच बॅरिएट्रिक सर्जन डॉ. राज गजभिये म्हणाले.

एकट्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शल्यक्रिया विभागात पूर्वी दोन आठवड्यातून एखाद्या व्यक्तीवर स्थूलपणा कमी करण्यासाठी नको असलेली आणि जमा झालेली चरबी काढण्यासाठी बेरियाट्रिक सर्जरी होत असे. मात्र, कोरोना विषाणूमुळे लागलेला लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे बैठे काम वाढले. तसेच मेडिकलमध्ये होणाऱ्या लठ्ठपणावरील शस्त्रक्रिया वाढल्या. मेडिकलच्या बेरियाट्रिक शस्त्रक्रिया विभागात आता आठवड्यातून एक वा कधी कधी दोन जणांवर शस्त्रक्रिया केली जात आहे. मेडिकलमध्ये बॅरिऐट्रिक सर्जरीला सुरूवात झाल्यापासून एक हजारावर लठ्ठपणा कमी करण्याच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

लठ्ठपणा हा जीवनशैलीचा आजार आहे. घरी टीव्हीसमोर असताना अनियंत्रित आहार, आराम, घरी काम करण्याचा ताण यातून सरासरी दोन टक्के लोकसंख्या लठ्ठपणाचा सामना करत आहे. अमेरिकन नागरिकांमध्ये लठ्ठपणा सामान्य आजार आहे. आता भारतामध्येही सामान्य होत आहे. आपल्याकडील लठ्ठपणा पोट आणि कमरेचा वाढता घेर यातून दिसतो. यामुळे मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अपचन, स्लीप अॅप्निया, सांधेदुखीसारखे आजार वाढत आहेत. यावर बॅरिएट्रिक सर्जरी वरदान ठरत आहे.
-डॉ. राज गजभिये, बेरियाट्रिक सर्जन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com