Ganesh Festival : देखावे तयार करण्यासाठी पाचशे कलावंत

नागपूरसह परराज्यातील कलावंत लागले कामाला; कला दिग्दर्शक साकारणार लक्षवेधी संकल्पना
Five hundred artists to create scenes Ganesh Festival
Five hundred artists to create scenes Ganesh Festival
Updated on

नागपूर - सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत महाराष्ट्राची संस्कृती जपणारे अनेक गणपती मंडळं देखाव्याद्वारे या उत्सवाला भव्य स्वरूप प्रदान करतात. विविध संकल्पनांवर आधारित हे देखावे धार्मिक वातावरण तयार करून संदेशही देतात. यंदा हे देखावे साकारण्यासाठी शहरासह परराज्यातील पाचशे कलावंत परिश्रम घेत आहेत.

नागपूरसह बंगाल, मध्यप्रदेश, गोंदिया आदी राज्य व जिल्ह्यातील कलावंत प्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृती हुबेहुब साकारतात. पेंटिंग, फायबर कास्टिंग, कलर स्कीम आणि कला दिग्दर्शक असे विविध कलावंतांचा या कामात लागतात. शहरातील संती गणेशोत्सव मंडळ, महालचा राजा, दक्षिणमुर्ती गणेशोत्सव मंडळ, भेंडे लेआउट गणेशोत्सव मंडळ, भारत क्रीडा मंडळ महाल, महालचा राजा, अष्टविनायक बहुद्देशीय संस्था धंतोली अशी आठ ते दहा गणेश मंडळं भव्य देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे.

गणेशोत्सवासाठी ऐतिहासिक इमारती, मंदिरे किंवा सामाजिक संदेश डोळ्यापुढे ठेवून मंडपाची संकल्पना निवडली जाते. याची तयारी सुरू झाली असून विशेषत: कला दिग्दर्शक त्यादृष्टीने मेहनत घेत आहेत. कोरोना काळातील दोन वर्षे उत्सवावर निर्बंध असल्याने त्यावेळी विचार केलेल्या संकल्पनांवर कला दिग्दर्शकांनी परिश्रम घेत आहेत. यंदा त्या प्रत्यक्षात उतरणार असल्यामुळे भव्यतेसह अधिक कल्पक देखावे पहायला मिळणार आहे. यात बाके बिहार मंदिर, शेगाव येथील गजानन महाराज मंदिर, शिवसृष्टी, घारापुरी लेणी आदींचे देखावे प्रमुख मंडळांकडून साकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

देखाव्यातील विविध टप्पे

  • काल्पनिक आराखडा

  • रेखाटन

  • मंडपाची डिजिटल प्रतिमा

  • हँडमेड मॉडेल तयार

  • दहा दिवसांपूर्वी बांधणीला सुरुवात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MSRTC Extends Temporary 10% Fare Increase for Ordinary Bus Services
Nagpur
Sanjay Raut
A man suffered severe electric shock after climbing a freight train at Nagpur Railway Station and coming in contact with an overhead high-voltage wire.
Marathi News Esakal
www.esakal.com