Peacock : नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील खैरी येथे किटकनाशकांमुळे पाच मोरांचा मृत्यू झाला. त्यांचे अवयव तपासणीसाठी भोपाळ आणि नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
नागपूर : कामठी तालुक्यातील खैरी येथे पाच मोरांचा मृत्यू शेतात फवारलेल्या किटकनाशकांमुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मोरांच्या अवयवाचे नमुने भोपाळ आणि नागपूर येथील न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.