esakal | प्रेयसीने केली आत्महत्या ; प्रियकरासह पाच जणांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेयसीने केली आत्महत्या ; प्रियकरासह पाच जणांवर गुन्हा दाखल

प्रेयसीने केली आत्महत्या ; प्रियकरासह पाच जणांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : प्रेमसंबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार देत नातेवाईक युवतीशी लग्न केल्यामुळे नैराश्‍यात गेलेल्या प्रेयसीने आत्महत्या (girl committed suicide) केली. या प्रकरणी प्रियकर आणि नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a crime against a relative) करण्यात आला. पूजा बोंबले (३०, रा. शांतीनगर) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. तर मुख्तार अहमद ऊर्फ समीर ऊर्फ मुस्तफा असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. (Five-people-including-boyfriend-have-been-charged-in-connection-with-suicide)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा ही आई-वडील, तीन बहिणी आणि भावासह शांतीनगरात राहते. उच्चशिक्षित असलेली पूजा ही एमपीएससीची तयारी करीत होती. पूजाचे बीसीएपर्यंत शिक्षण झाले होते. दोन वर्षांपासून ती एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होती. तिचे क्लासेस सुरू होते.

हेही वाचा: शिवसेनेच्या दोन गटात राडा! मास्क न लावल्याच्या कारणावरून वाद

तिचा वर्गमित्र असलेला मुख्तार याच्याशी तिचे १२ वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. दुसरीकडे मुख्तार फक्त तिच्या प्रेमाचा गैरफायदा घेत होता. मुख्तारने तिच्या प्रेमाचा गैरफायदा घेत अंधारात ठेवले. तिला कधीही घरी न नेता लग्न करण्याचे फक्त आमिष दाखवत राहीला. मुख्तारने लगेच आई-वडिलांना सांगून नातेवाईक असलेल्या मुलीशी साक्षगंध उरकून घेतले.

नातेवाईकांनी केला छळ

मुख्तारचे साक्षगंध होताच पूजा मुख्तारची भेट घेण्यासाठी गेली. आरोपी प्रियकर मुख्तार, वडील, आई अल्फीया आणि बहीण जुब्बो यांनी तिला शिवीगाळ करून हाकलून लावले. लग्न करण्यास नकार दिला. काही दिवसांपूर्वीच त्याने गुपचूप लग्न उरकून टाकले. ही माहिती मिळताच पूजा खचली. ती नैराश्‍यात गेली. तिने कुटुंबियांना सांगितले. मुख्तारने दगा दिल्याचा धक्का तिला सहन झाला नाही. त्यामुळे तिने आत्महत्या केली. तिने सुसाईड नोटमध्ये मुख्तार व त्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या त्रासाबद्दल लिहून ठेवले आहे, हे विशेष.

(Five-people-including-boyfriend-have-been-charged-in-connection-with-suicide)

loading image