नागपूर ग्रामीणमध्ये घडला विचित्र अपघात; भरधाव ट्रॅक्सची कार व ट्रकला जोरदार धडक

Five persons were seriously injured in a bizarre accident in rural Nagpur
Five persons were seriously injured in a bizarre accident in rural Nagpur

कोंढाळी (जि. नागपूर) : चाकडोह शिवारात एका अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्स चालकाने एका कारचा पाठलाग करताना दुपारी दीडच्या सुमारास कारला धडक दिली व नंतर या ट्रॅक्सने दुसऱ्या लेनवर जाऊन समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. या विचित्र अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले.

नागपूर येथील मारोती ओमनी (क्रमांक एमएच ३०, ए झेड) नागपूरकडून अकोल्याकडे जात होती. चालक रवी विनोद राठोड (वय ३५, रा. विठ्ठलनगर, मोठी उमरी, अकोला) याने बाजारगाव येथून नागपूर-कोंढाळी मार्गावरील चमेली येथील साई मंदिर येथे जाण्यासाठी सोलार कंपनीच्या कर्मचारी वीरेंद्र त्रिपाठी (वय ३२) त्यांची पत्नी सिलू वीरेंद्र त्रिपाठी व चिमुकला उत्कर्ष (वय २, रा. राघवली, तालुका सिमरीया, जि. रिवा मध्यप्रदेश, हल्ली मु. बाजारगाव) यांना ‘लिफ्ट’ दिली.

बाजारगाव येथून अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्सचा (क्रमांक एमएच १४, एएम ७५०५) चालक अमोल ढोले (वय २३, रा. बाजारगाव) याला मारोती ओमनी चालक आपले प्रवासी नेणार असे वाटले. म्हणून त्याने बाजारगाव बसस्टॉप येथून मारोती ओमनीचा भरधाव वेगात पाठलाग सुरू केला.

सोलार कंपनीच्या गेटजवळ मारोतीला मागून जोरदार कट मारली. या धडकेने मारोती रोडच्या बाजूच्या एका खड्यात जाऊन उलटली. तर मारोतीला धडक दिल्यानंतर ही ट्रॅक्स रोड दुभाजकावरून उसळली व कोंढाळीकडून येणाऱ्या कंटेनर ट्रकला ( एमएच0४, जेयु ८७९३) समोरून धडक दिली.

हा ट्रक मुंबई येथून औषधी घेऊन नागपूरकडे जात होता. या अपघातात ओमनीचालक रवी राठोड (वय ३५, रा. अकोला) व ओमनीमधील प्रवासी वीरेंद्र त्रिपाठी त्यांची पत्नी सिलू, दोन वर्षांचा चिमुकला उत्कर्ष व धडक देणारा ट्रॅक्स चालक अमोल ढाले हे गंभीर जखमी झाले. अपघातात होताच नागपूरकडून दुचाकीने कोंढाळीकडे येणाऱ्या किष्णा तिवारी (वय ३०) व राम पाठक (वय २०, रा. जरीपटका नागपूर) यांनी जखमींना तातडीने मदत केली.

अपघातग्रस्तांना वाहनाबाहेर काढले. कोंढाळीचे ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांना अपघाताची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचले व स्वतः गंभीर जखमी मारोतीचालक रवी राठोड यांच्यावर प्राथमिक उपचार केले.

सर्व जखमींना नागपूरच्या वैद्यकीय शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. कोंढाळी पोलिसांनी ट्रॅक्सचालक अमोल ढालेविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. कोंढाळीचे ठाणेदार विश्वास फुल्लरवार पुढील तपास करीत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com