Nagpur Accident News : विचित्र अपघातात पाच वाहनांना धडक; अजनी चौकातील अपघात पाच जण गंभीर जखमी

अ‍ॅक्सिलेटर दाबल्यानंतर ते वर आलेच नाही, परिणामी मनपाच्या आपल्या बसचा वेग प्रचंड वाढला आणि सलग पाच वाहनांना चिरडले. हा विचित्र अपघात अजनी चौकात मंगळवारी सायंकाळी घडला.
Nagpur Accident News
Nagpur Accident NewsSakal

नागपूर : अ‍ॅक्सिलेटर दाबल्यानंतर ते वर आलेच नाही, परिणामी मनपाच्या आपल्या बसचा वेग प्रचंड वाढला आणि सलग पाच वाहनांना चिरडले. हा विचित्र अपघात अजनी चौकात मंगळवारी सायंकाळी घडला.

या घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. आरती अमोल ठाकरे, गौरव काळे, निखिलकुमार वाणे, सुहास नवाथे अशी जखमींची नावे आहेत. नेहमीप्रमाणे अमर जवान स्मारक अजनी चौकातील वाहतूक सुरू होती. अचानक पाऊस सुरू झाला. यामुळे प्रत्येकजण घरी जाण्याची घाई करीत होता.

तेव्हाच एमएच ४९ बीझेड २४४० क्रमांकाची इलेक्ट्रिकवर चालणारी आपली बस आरोपी बस चालक प्रभू चमदूरकर घेऊन जात होता. गर्दी असतानाही त्याला वेगाने वाहन न्यायची घाई होती. येथेच गडबड झाली अन् त्याने अ‍ॅक्सिलेटर दाबले.

यामुळे बस वेगानेच समोर निघाली. पण अचानक मध्ये काही वाहनचालक आल्यानंतर त्याने ब्रेक दाबले. पण जे अ‍ॅक्सिलेटर दाबले होते ते खालून वर आलेच नाही. यामुळे वाहनाचे ब्रेक निकामी ठरले अन् ते अनियंत्रित होऊन पाच वाहनांना अक्षरश: चिरडून समोर गेले. बसच्या समोरच्या चाकात दोन दुचाकी अडकल्याने आपली बस थांबली.

या अपघातात एमएच ३१ ईबी १९४३, एमएच ३१ व्हीएस ९२३, एमएच ४९ एक्स ९००१, एमएच ३२ एएस ०४६४, एमएच ३२ एसी ०९९१ क्रमांकाच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुहास नवाथे आणि आरती ठाकरे यांच्या दुचाकीचा तर पूर्णत: चुराडा झाला. या अपघातात आरती ठाकरे यांच्या उजव्या हाताला गंभीर मार लागला आहे.

सायंकाळची वेळ होती, शिवाय पाऊसही सुरू झाल्यानंतर प्रत्येकाला घाई होती. याच घाईने सर्वांचा घात केला. लोकांनी जखमींना रुग्णालयात पोहोचविले. तर काही मंडळी व्हिडीओ बनविण्यात मश्‍गुल होते. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी आरोपी चालक प्रभू चमदूरकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मनपाकडून वाहनांची योग्य देखभाल होत नसल्याचेच अपघातानंतर पुढे आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com