esakal | नागपूर : हिंदू मुलींना बुरखा घालण्याचा प्रयत्न; विहिंपची पोलिस ठाण्यात तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर : हिंदू मुलींना बुरखा घालण्याचा प्रयत्न

नागपूर : हिंदू मुलींना बुरखा घालण्याचा प्रयत्न

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : ‘हिजाब-डे’च्या नावाखाली अल्पवयीन हिंदू मुलींना बुरखा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार उपराजधानीत सिव्हिल लाइनमधील रामगिरी या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वॉकर स्टीटवर घडला. या घटनेने शहरात खळबळ उडवून दिली आहे. विश्व हिंदू परिषदेने याविरोधात सदर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. प्राप्त तक्रारीच्या आधारे चौकशी सुरू असून निष्पन्न होणाऱ्या माहितीच्या आधारे कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

गर्ल्स फॉर इस्लाम ऑर्गनायझेशन (जीआयओ)च्या सदस्य असणाऱ्या चार ते पाच मुली हिजाब घालून रामगिरी रोडवर पहाटे पोहोचल्या. इथे फिरण्यासाठी आलेल्या मुलींना पत्रके वाटून बुरखा घालण्याचा प्रयत्न करीत होत्या, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणने आहे. हा प्रकार बघून मॉर्निंग वॉक करणाऱ्या काही नागरिकांनी बुरखा घातलेल्या मुलींना विरोध दर्शविला. त्यांचे बुरखे उतरवले. तसेच त्या मुलींना सुरू असलेल्या प्रकाराबाबत जाब विचारला.

हेही वाचा: पुण्यातील युवकाने केला नागपुरातील युवतीवर बलात्कार

प्रारंभी या मुलींनी हिंदू मुलींनी स्वेच्छेने बुरखे घातल्याचा दावा उच्चस्वरात केला. स्वच्छेने हे सुरू असून आडकाठी आणण्याचा प्रयत्न करू नका असे त्या खडसावून सांगत होत्या. नागरिकांचा आक्षेप आणि दबाव वाढत असल्याने त्यांनी काढता पाय घेतला. या घटनाक्रमाची छायाचित्रे व व्हिडिओ शहरात व्हायरल झाली. यामुळे चांगलीच खळबळ उडाली.

विश्व हिंदू परिषदेने या घटनेची गंभीर दखल घेतली. विहिंपचे महानगर उपाध्यक्ष अमित बेम्बी, बजरंगदल सहसंयोजक रिषभ अरखेल, नारी सुरक्षा प्रमुख विनोदचंद्र नायर, संदीप नायर, रोहन बोदेले, अनिकेत अरखेल, ईशान जैन आदींनी सदर पोलिस ठाण्यात पोहोचून तक्रार दाखल केली. या तक्रारीत संबंधित अज्ञात महिलांच्या वाहनांचे क्रमांकही देण्यात आले आहे. तातडीने कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. या प्रकारावर पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पोलिसांकडून संयमाचे आवाहन

सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता अल्याने या घटनेशी संबंधित व्हिडिओ, मॅसेज किंवा पोस्ट फारवर्ड करू नका. संयम राखा, असे आवाहन पोलिस दलाने केले आहे.

हेही वाचा: भीक मागण्यासाठी चिमुकल्यांची विक्री; ‘ती’ बालके देऊळगाव महीतील

मुलींकडून लेखी माफी

घटनेनंतर संबंधित मुली आणि पालकांनी लेखी माफी मागितली आहे. त्यात हिजाब डे निमित्त स्वेच्छिक स्वरूपात माहिती देत होतो. कुणालाही जबरदस्ती केली नाही. त्यात धार्मिक द्वेश भडकविण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे माफीनाम्यात म्हटले आहे.

loading image
go to top